घरमुंबईकरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आठवडी बाजार बंद

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आठवडी बाजार बंद

Subscribe

मीरा-भाईंदरमध्ये करोनाचे संशयित आढळून आल्यामुळे मीरा भाईंदर पालिकेने सतर्कता घेत पालिका कार्यालयात येणार्‍या नागरिकांना पूर्ण वेळ प्रवेश बंद केला आहे. तसेच शहरात भरणारे सर्व आठवडे बाजार बंद करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात दररोज वेगवेगळ्या ठिकाणी आठवडे बाजार भरवले जातात.या आठवडे बाजारात हजारो नागरिक खरेदीसाठी येतात. या बाजारात नागरिकांची मोठी गर्दी असते. या गर्दीमध्ये करोनाचे विषाणू मोठ्या प्रमाणात पसरण्याची दाट शक्यता आहे. याची खबरदारी घेण्यासाठी सुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून जमेल त्या पद्धतीने उपाययोजना करून काळजी घेतली जात आहे. हे आठवडी बाजार भाईंदर पश्चिम, मिरारोड, पेनकरपाडा, नवघर, काशीमीरा अशा अनेक ठिकाणी बेकायदेशीर पणे भरत आहेत. या बाजारात बसणार्‍या फेरीवाल्याकडून वसुली केली जाते. परंतु या बेकायदेशीर बसणार्‍या फेरीवल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हे सर्व आठवडी

- Advertisement -

बाजार शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शहरातील जनतेने कोरोनाच्या साथीला रोखण्यासाठी सहभाग घ्यावा व प्रशासनाला सहकार्य करावे असे पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी आवाहन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -