Panvel-madgaon christmas special : पनवेल-मडगाव दरम्यान ख्रिसमस आणि नवीन वर्षात साप्ताहिक विशेष ट्रेन

Central Railway will run 42 special services during winter-Christmas
मध्य रेल्वे हिवाळी-ख्रिसमस दरम्यान ४२ विशेष सेवा चालवणार

ख्रिसमस आणि नवीन वर्षात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने पनवेल आणि मडगाव दरम्यान पूर्णतः आरक्षित साप्ताहिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशिल खाली दिलेल्या नुसार:

०१५९५ विशेष पनवेल येथून २२ नोव्हेंबर २०२१ ते ३ जानेवारी २०२२ पर्यंत दर सोमवारी ०६.०५ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ६:४५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. ०१५९६ विशेष पनवेल येथून २१ नोव्हेंबर २०२१ ते २ जानेवारी २०२२ पर्यंत दर रविवारी मडगाव येथून १६.०० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०३.१५ वाजता पोहोचेल. रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी या स्थानकांवर विशेष साप्ताहिक ट्रेन थांबतील

संरचना : १ प्रथमसह द्वितीय वातानुकूलित, २ द्वितीय वातानुकूलित, ६ तृतीय वातानुकूलित, ६ शयनयान, ४ द्वितीय आसन श्रेणी आणि एक पॅन्ट्री कार.

आरक्षण: पूर्णतः आरक्षित विशेष ट्रेन क्रमांक 01595 साठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. २०.११.२०२१ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अ‍ॅप डाउनलोड करा. या विशेष ट्रेनमध्ये बसण्यासाठी, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानी कोविड-१९ शी संबंधित सर्व नियमांचे पालन करून केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली जाईल.


हे ही वाचा – तर चंद्रकांत पाटलांसाठी शोकसभा आयोजित करू, राऊतांचा पलटवार