घरक्रीडामीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी, हाताला दुखापत होऊनही पटकावले रौप्य पदक

मीराबाई चानूची ऐतिहासिक कामगिरी, हाताला दुखापत होऊनही पटकावले रौप्य पदक

Subscribe

भारताची स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ४९ किलो गटात २०० किलो वजन उचलून रौप्य पदक जिंकले आहे. या रौप्य पदकासह वेटलिफ्टर मीराबाई चानूने वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास रचला आहे. कोलंबियातील बोगोटा येथे ही स्पर्धा पार पडली. मीराबाई चानूच्या या कामगिरीनंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी कौतुक केले आहे.

वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये चीनची वेटलिफ्टर जियांग हुइहुआने २०६ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले. तसेच, चिनी वेटलिफ्टर हौ झिहुईने १९८ किलो वजन उचलून कांस्यपदाची कमाई केली. हौ झिहुई ही ४९ किलो वजनी गटातील ऑलिम्पिक चॅम्पियन आहे. हौ झिहुईने टोकियो ऑलिम्पिकमध्ये ४९ किलो गटात सुवर्णपदक जिंकले होते. मात्र, मीराबाईने या स्पर्धेत झिहूईचा पराभव केला आणि रौप्य पदक पटकावले. त्यामुळे झिहुईला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

- Advertisement -

हेही वाचा – भारताच्या नव्या प्रशिक्षकासाठी ‘या’ खेळाडूंच्या नावाची चर्चा

या वेटलिफ्टिंग वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चानू हिला प्रवेश करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या स्पर्धेदरम्यान ती दुखापतीशी झुंजत होती. तिने क्लीन अँड जर्कमध्ये ११३ किलो वजन उचलले. मात्र, स्नॅच प्रकारात वजन उचलत असताना तिचा तोल गेला, पण अशा परिस्थितीतही तिने स्वता:चा शानदार बचाव केला. मीराबाईने स्नॅचमध्ये ८७ किलो वजन उचलले. अशा प्रकारे तिने एकूण २०० किलो वजन उचलून इतिहास रचला.

- Advertisement -


मीराबाई चानूला या वर्षी सप्टेंबरमध्ये ट्रेनिंदरम्यान दुखापत झाली होती. ती मनगटाच्या दुखापतीशी झुंज देत आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या नॅशनल गेम्समध्येही ती दुखापतीसह सहभागी झाली होती. मीराबाईचे हे वर्ल्ड चॅम्पियनशिपमधील दुसरे पदक आहे. यापूर्वी मीराबाई चानू २०१७ मध्ये १९४ किलो (८५ आणि १०९ किलो) वजन उचलून सुवर्ण जिंकले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -