घरमुंबईपश्चिम रेल्वे प्र्रवाशांना ठेवते अंधारात

पश्चिम रेल्वे प्र्रवाशांना ठेवते अंधारात

Subscribe

अघोषित ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल

पश्चिम रेल्वेने प्रवाशांना पूर्वकल्पना न देता सोमवारी रात्री बांद्रा रेल्वे स्थानकाच्या पुलावर गर्डर लॉन्चिंग करण्यासाठी मेगा ब्लॉक घेतल्यामुळे प्रवाशांचे पुरते हाल झालेे आहेत. त्यामुळे प्रवाशांनी पश्चिम रेल्वेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे. आठवड्यातून दोन किंवा तीन दिवस पश्चिम रेल्वे धीम्या मार्गावर रात्री 11. 35 नंतर अचानक ब्लॉक घेत असल्यामुळे कार्यालयातून घरी जाणार्‍या प्रवाशांचे मेगा हाल होत आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रत्येक रविवारी दुरूस्तीकामासाठी मेगा ब्लॉक घेतला जातो.तरी सुद्धा रेल्वेच्या रुळाला तडा जातो तर कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड होतो. त्यामुळे लोकलसेवा नेहमीच उशिरा धावत असते. मात्र आता काही बिघाड नसतानासुद्धा लोकल सेवा उशिरा असल्याच्या तक्रार प्रवाशांकडून येत आहे. तसेच रविवारी मेगाब्लॉक असल्यामुळे प्रवासी घराबाहेर पडत नाही. मात्र, आता न सांगता पश्चिम रेल्वे ब्लॉक घेत असल्याची तक्रार प्रवाशांकडून करण्यात येत आहे. यासंबंधी उद्घोषणा सुध्दा होत नसल्याचे आरोपही प्रवाशांनी केला आहे.

- Advertisement -

सोमवारी बांद्रा रेल्वे स्थानकाच्या पुलावर गर्डर लॉन्चिंग करण्यासाठी अप लोकल लाईनवर फलाट नंबर वर 2 ब्लॉक घेण्यात आलेला होता. हा ब्लॉग प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर घेण्यात आल्याने रात्री 11. 35 वाजता चर्चगेटच्या दिशेने जाणार्‍या गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. मात्र याची माहिती प्रवाशांना नव्हती. त्यामुळे प्रवाशी लोकल गाडयांची वाट पाहत ताटकळत उभे होते.

यासंबंधीत दैनिक ‘आपल महानगर’ने पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सुनिल कुमार यांना विचारले असता लोकलसेवा सोमवारी रात्री वेळ सुरू होती ,त्यानंतर ती नियमीत वेळेनुसार बंद करण्यात आली होती,असे त्यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -