Homeताज्या घडामोडीWestern Railway : पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर मिळणार आरामदायी सुविधा; डिजिटल लाउंज उभारण्याचा...

Western Railway : पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर मिळणार आरामदायी सुविधा; डिजिटल लाउंज उभारण्याचा निर्णय

Subscribe

पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पश्चिम रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. बऱ्याचदा प्रवाशांची गर्दी स्थानकांवर वाढत असल्याने प्रवाशांना धक्काबुक्की सहन करत प्रवास करावा लागतो. त्यामुळे पश्चिम रेल्वेने मुंबईतील प्रमुख स्थानकांवर डिजिटल लाउंज म्हणजेच विश्रामगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. पश्चिम रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. बऱ्याचदा प्रवाशांची गर्दी स्थानकांवर वाढत असल्याने प्रवाशांना धक्काबुक्की सहन करत प्रवास करावा लागतो. त्यामुळे पश्चिम रेल्वेने मुंबईतील प्रमुख स्थानकांवर डिजिटल लाउंज म्हणजेच विश्रामगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे डिजिटल लाउंज ही सुविधा विमानतळावर असते, त्याच धर्तीवर आता पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर या सुविधा मिळणार आहेत. (Western Railway Will Provide digital lounge Facilities like Airport on stations in mumbai)

पश्चिम रेल्वेचे नवे मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक तरुण जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर प्रवाशांसाठी पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अंतर्गत डिजिटल लाउंजची स्थापना केली जाणार आहे. सध्यस्थितीत प्रवासी रेल्वे स्थानकांवर वेटिंग रूममध्ये ट्रेनची वाट पाहत असतात. तसेच, अधिक पैसे देऊन ते एक्झिक्युटिव्ह लाउंजमध्ये आराम करू शकतात. पण तिथे त्यांना ऑफिसची कामे करता येत नाहीत. परिणामी प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

असे असणार डिजिटल लाउंज

प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता पथदर्शी प्रकल्पांतर्गत काही स्थानकांवर डिजिटल लाउंज उभारले जाणार आहे. हे लाउंज विमानतळाप्रमाणेच आधुनिक असेल. चार्जिंगसाठी प्लग पॉइंट, वायफाय, कॅफे, खुर्च्या, टेबल आणि सोफा यासारख्या सुविधा प्रवाशांना पुरविल्या जाणार आहेत. या डिजिटल लाउंजकरीता प्रथम स्थानके निश्चित केली जाणार आहेत. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वेच्या स्थानकांवर उभारण्यात येणाऱ्या डिजिटल लाउंजमध्ये प्रवाशांसह बाहेरील नागरिकांनाही सुविधा उपलब्ध असणार आहे. विद्यार्थी येऊन आपली कामं करू शकतात. या ठिकाणी काही शॉप असतील.

विश्रामगृहात ‘या’ सुविधा मिळणार

  • मोफत वीज
  • कामासाठी खुर्ची आणि टेबल
  • वायफाय
  • प्लग पॉइंट
  • कॅफे

हेही वाचा – Pratap Sarnaik : मुंबई महानगर क्षेत्रात वाहतुकीसाठी केबल कारचा पर्याय; प्रताप सरनाईक घेणार गडकरींची भेट

Vaibhav Patil
Vaibhav Patil
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -