Monday, February 22, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली, जोगेश्वरी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड

पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली, जोगेश्वरी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड

तांत्रिक बिघाडामुळे चर्चगेट ते विरारकडे जाणारी लोकल १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहे.

Related Story

- Advertisement -

मुंबईतील जोगेश्वरी स्थानकाजवळ काही तांत्रिक बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक १० ते १५ मिनिटे उशीराने होत आहे. गर्दीची वेळ असल्याने तसेच कर्मचाऱ्यांना कामावर पोहोचण्यासाठी उशीर होत असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. जोगेश्वरी स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे चर्चगेट ते विरारकडे जाणारी लोकल १० ते १५ मिनिटे उशीराने धावत आहे. तर सकाळच्या सत्रातील लोकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागला आहे. अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. तांत्रिक बिघाडाच्या दुरुस्तीनंतर लोकल वेळेत धावतील असे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -