घरताज्या घडामोडीहे आहे विरार ते डहाणु दरम्यानच्या २ मेमूचे वेळापत्रक!

हे आहे विरार ते डहाणु दरम्यानच्या २ मेमूचे वेळापत्रक!

Subscribe

पश्चिम रेल्वेने विरार ते डहाणू दरम्यान उद्यापासून दोन मेमूच्या अतिरिक्त फेर्‍या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

विरार ते डहाणू दरम्यान रेल्वे प्रवास करणार्‍या अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेने विरार ते डहाणू दरम्यान उद्यापासून दोन मेमूच्या अतिरिक्त फेर्‍या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या मेमू ट्रेनच्या फेर्‍या विरार स्थानकातून रात्री १० वाजून ५५ ला सुटले तर पहाटे ४ वाजून ५०  मिनिटांनी विरार स्थानकातून सुटले. या दोन मेमूच्या अतिरिक्त फेर्‍यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

 प्रवाशांनी केली होती मागणी 

पश्चिम रेल्वे मार्गावर डहाणू, वानगाव, बोईसर, उमरोली, पालघर, सफाळे,वैतरणा येथून बोरिवली, अंधेरी येथील शताब्दी रुग्णालय, भगवती हॉस्पिटल बोरिवली, ओशिवरा कूपर, नायर, केईएम सायन अशा अनेक रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय, सफाई कामगार, अशा अत्यावश्यक सेवांसाठी दररोज प्रवास करीत असतात. मात्र, त्यांच्या वेळेनुसार लोकल सेवा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांची गैरसोय होते. त्यामुळे पश्चिम रेल्वेने त्यांच्या वेळेनुसार लोकल सेवा सुरू करण्याची मागणी कर्मचार्‍यांनी केली होती. त्यासंबंधित पत्र सुद्धा पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील डहाणू रोडवरून चर्चगेट दिशेकडे जाण्यासाठी पहाटे ५, सकाळी ११.३० आणि सायंकाळी ६.१० वाजता लोकल सोडण्यात यावी. तर परतीचा प्रवास करण्यासाठी बोरिवलीवरून सकाळी ७.३८, दुपारी २.३०आणि रात्री ९.१० वाजता डहाणूसाठी लोकल सेवा असावी अशी मागणी वैद्यकीय कर्मचार्यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीची दखल घेत पश्चिम रेल्वे प्रशासनाने आता विरार ते डहाणू दरम्यान मेमूच्या २ फेर्‍या वाढविल्या आहेत.विरार स्थानकातून रात्री १० वाजून ५५ ला सुटलेली मेमू डहाणू स्थानकात रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी पोहोचणार. तसेच डहाणु येथून पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी सुटलेली गाडी विरार स्थानकात सकाळी 6 वाजता येणार आहे.

- Advertisement -

 पश्चिम रेल्वे ३५० लोकल फेर्‍या

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्यांसाठी १५ जून पासून मर्यादित लोकल प्रवास सुरु करण्यात आला आहे. पश्चिम रेल्वेवर दररोज लोकलच्या 350 फेर्‍या चालविण्यात येतात.त्यापैकी १६१ फेर्‍या चर्चगेट ते विरार दरम्यान धावतात,७ फेर्‍या नालासोपारा ते चर्चगेट, वसई रोड,विरार हुन चर्चगेटकरिता प्रत्येकी २-२ फेर्‍या , विरार ,वसई रोज ते बोरीवली दरम्यान प्रत्येकी २-२ फेर्‍या, चर्चगेट ते बोरीवली दरम्यान १३४ फेर्‍या, महालक्ष्मी ते बोरीवली ६,चर्चगेट ते डहाण रोड ६, बोरीवली ते डहाणू २,विरार ते डहाणू दरम्यान २८ फेर्‍या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -