घरनवरात्रौत्सव 2022पश्चिम रेल्वेची पहिली जिगरबाज महिला मोटरमन

पश्चिम रेल्वेची पहिली जिगरबाज महिला मोटरमन

Subscribe

कुटूबांची जबाबदारी असतना तिने मोटरमनची भूमिका बजावली

एककिकडे तिला मातृत्वाची भूमिका पारपाडायची होती. तर दुसरीकडे रेल्वेची मोटरमनची जबाबदारीची नोकरी सुद्धा बजवायची होती. मात्र तिने यादोन्ही काम उत्तमरित्या करून सर्व रेल्वेतील महिला कर्मचांर्‍याना समोर एक आदर्श ठेवणार ती रणरागीनी दूसरी कोणीही नसून पश्चिम रेल्वेची पहिल मोटरमन प्रीती कुमारी आहेत. त्यांच्या या कार्यास पश्चिम रेल्वेकडून अनेकदा गौरव करण्यात आला आहेत.

प्रीती कुमारी बिहारच्या बाका जिल्हातील कुमरखार या छोट्याशा गावाततील शेतकरी कुटूंबात प्रीतीचा जन्म झाला होता. प्रतिला तीन बहिणी आणि एक भाऊ आहे. प्रीती कुमारी लहानपणापासून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे तिचे स्वप्न होतं. ज्या गावातून ती येत होती. त्या गावातील मुली जास्त शिकत नव्हत्या. कारण शेतकर्‍यांच्या आर्थिक परिस्थिती खूप दुर्बल होती. त्यामुळे शेतकरी कुटुंबात जन्म घेणार्‍या मुलींना जास्त शिक्षणात महत्व देत नव्हते. ही परंपरा मोडीत काढून प्रितीने शिक्षण सुरू केले. मात्र वर्ष 2000 मध्ये ग्रॅज्युएशन सुरू असताना प्रीतीचे लग्न झाले. प्रीतीचे पती इंडियन एअर फोर्स मध्ये सार्जंट या पदावर कार्यरत होते. त्यांची पोस्टिंग महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यात होती. प्रीती लग्न झाल्यानंतर शिक्षण अर्ध्यात राहिल असत प्रीती वाटत होत. मात्र प्रीतीने अभ्यासाला सुरुवात केली. तिने अभियांत्रिक क्षेत्राची पदवी मिळवली आणि यापदवीच्या जोरावर भारतीय रेल्वेत नोकरी करण्याची तिची इच्छा होती. मात्र तिला योग्य ती संधी मिळत नव्हती. जेव्हा पश्चिम रेल्वेची महिला मोटरमन साठी जागा निघाल्या,तेव्हा तिने ह्या संधीचा फायदा घेत नोकरीसाठी अर्ज केला. त्यावेळी तिला हे सुद्धा माहीत नव्हते की प्रीती पश्चिम रेल्वेचे पहिली मोटरमन असेल. प्रीतीने अभ्यास केला आणि पश्चिम रेल्वेची मोटरमनची 2009 मध्ये परीक्षा पास केली. तब्बल 9 वर्ष परिश्रम घेऊन भारतीय रेल्वेत पहिली मोटरमन म्हणून प्रीती लागली. प्रीतीची पहिली पोस्टिंग मुंबई उपनगरात मिळाली.ती पश्चिम रेल्वेची पहिली मोटरमन ठरली. तेथून तिचा प्रवास सूरू झाला आहेत.

- Advertisement -

माझा यशात आई वडीलाच्या मोठा वाटा
जेव्हा प्रीतीला मोटरमन नोकरी मिळाली होती. तेव्हा तिला एक मुलगी होती. ती फक्त तीन वर्षाची होती. प्रीतीला मुलीला सांभाळून मोटरमनची नोकरी बजवायची होती. मोटरमनची नोकरी खूप दबावाची आणि जबाबदारीची असते. यानोकरीत प्रवाशांची सुरक्षाची जवाबदारी यामोटरमनच्या खांद्यावर असते. त्यामुळे तिने आपली जबाबदारी आणि हे आव्हान मोठ्या कुशलतेने पेलले आहे. हे आवहान पलेन्यासाठी प्रीतीचे पती आणि आई वडीलाच्या मोठे योगदान आहे. त्यांच्या पाठिंब्यामुळे आज यशस्वीपणे पश्चिम रेल्वे काम करत आहे. अशी प्रतिक्रीया दैनिक आपल महानगरशी बोलताना प्रीती कुमारी यांनी दिली आहेत.

गावासाठी आदर्श ठरली प्रीती
प्रीतीच्या गावात अनेक कुटूबिय मुलाच्या शिक्षनाकडे जास्त लक्ष दयाचे .मात्र मुलीला शिक्षणाकडे लक्ष देत नव्हते.त्यामुळे अनेक मुली शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर जात होत्या. मात्र प्रीतीच्या आई वडीलानी प्रीतीच्या शिक्षीत करण्यासाठी प्राध्यान दिले. त्यामुळे प्रीती उच्च शिक्षण घेउुन भारतीय रेल्वे काम करत आहे. प्रीतीच्या या यशामुळे आज प्रीती गावासाठी एक आदर्श ठरली आहेत.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -