घरमनोरंजनकाय बोलली सुश्मिता सेन रोहमन शॉल सोबतच्या नात्यावर ?...

काय बोलली सुश्मिता सेन रोहमन शॉल सोबतच्या नात्यावर ?…

Subscribe


अभिनेत्री सुश्मिता सेन तिच्या जीवनातील काही वैयक्तिक गोष्टींमुळे नेहमीच चर्चेत असते. गेल्या वर्षी ललित मोदी यांच्यासोबत तिचं नाव जोडलं गेलं होतं. त्यासंदर्भात सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर ललित मोदींनी दोघांचे काही फोटोही शेअर केले होते. ज्यामुळे एका वेगळ्याच चर्चेला उधाण आलं होतं. त्यावर सुश्मिताने त्या पोस्टशी काही संबंध नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

सध्या तिचं लग्न एक चर्चेचा विषय बनून राहिला आहे. सध्या सुश्मिता तिचा बॉयफ्रेंड रोहमन शॉल सोबत लग्न करणार असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. रोहमन तिच्यापेक्षा १५ वर्षांनी लहान आहे. काही कालावधीपूर्वी दोघंही एकमेकांना डेट करत होते. दरम्यान दोघांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा माध्यमांतून प्रसारित झाल्या होत्या. त्यांनतर पुन्हा ते एकत्र आले होते. आता पुन्हा दोघांच्या लग्नाच्या प्लॅनिंगविषयी सुश्मितानेच एका मुलाखतीत वाच्यता केली आहे.

फिल्म कंपेनियनला दिलेल्या या मुलाखतीमध्ये आपलं प्लॅनिंग काय असेल यावर सुश्मिता मोकळेपणानं व्यक्त झाली आहे. ती म्हणते की,असं नाही की, मी नात्यांचा सन्मान करत नाही. माझा लग्नसंस्थेवर विश्वास आहे. पण मला माझं स्वातंत्र्य जास्त महत्वाचं वाटतं. सध्या मी कोणत्या टप्प्यावर सेट व्हावं याविषयी सगळं जग चर्चा करतंय. पण मला या सगळ्याची काही चिंता नाही.

आर्या या वेबसिरीज च्या निर्माता- दिग्दर्शकांबद्दल सुश्मिता म्हणते की, माझ्या जीवनात मला खूप चांगली माणसं मिळाली आहेत. आर्याचे दिग्दर्शक राम माधवानी आणि माझी निर्माती अमिता माधवानी यांचा त्यात समावेश आहे. मला आजतागायत भेटलेल्या काही प्रभावी व्यक्तिमत्वांपैकी ते आहेत. त्यांच्यासोबतच्या मैत्रीवर माझा विश्वास आहे आणि मैत्री चांगली असेल तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीची काळजी करण्याचं आवश्यकता नाही.

आर्या या मालिकेचा तिसरा सीझनचा टीझर काही दिवसांपूर्वीच समोर आला असून, ९ फेब्रुवारी रोजी आर्या प्रदर्शित होणार आहे. या वेबसिरीज मधून पुन्हा एकदा सुश्मिताचा एक नवा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -