Eco friendly bappa Competition
घर मुंबई whatsapp chatbot : नालेसफाईची तक्रार नोंदवण्यासाठी महापालिकेची सुविधा

whatsapp chatbot : नालेसफाईची तक्रार नोंदवण्यासाठी महापालिकेची सुविधा

Subscribe

 

मुंबई: ज्या भागात नालेसफाई झालेली नसेल, गाळ उचलला नसेल किंवा नालेसफाईच्या कामांबाबत मुंबईकरांना १ जूनपासून ९३२४५००६०० या whatsapp chatbot क्रमांकावर तक्रार करता येणार असून आपला अभिप्रायही नोंदवता येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील पावसाळा पूर्व नालेसफाईच्या कामांची दोन दिवस (१९ व २० मे रोजी) पाहणी केली होती.

- Advertisement -

नालेसफाईची कामे प्रामाणिकपणे व खोलवर जाऊन करावी. यंदा पावसाळयात पाणी साचल्यास संबंधित अधिकाऱ्यांना नारळ देऊन घरी पाठवण्याचा इशाराही दिला होता. याच नालेसफाईच्या कामांची पाहणी केल्यानंतर नालेसफाईच्या कामांबाबत नागरिकांना तक्रारीं करण्यासाठी यंत्रणा, संपर्क क्रमांक उपलब्ध करण्याचे आदेश मुख्यमंत्री शिंदे पालिका आयुक्त इकबाल चहल यांना दिले होते. त्यानुसार अखेर पालिका यंत्रणेने दहा दिवसांनंतर, नालेसफाई कामांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी ९३२४५००६०० हा whatsapp chatbot क्रमांक उपलब्ध केला असून त्यावर १ जूनपासून तक्रार करता येणार आहे.

हेही वाचाः नालेसफाईत चुका आढळल्यास कंत्राटदारांवर कारवाई करा; आशिष शेलारांचे पालिका आयुक्तांना निवेदन

- Advertisement -

मुंबईतील नाल्यांतून गाळ काढण्याच्याबाबत तक्रार करण्यासाठीची प्रक्रिया नागरिकांसाठी सुलभ व्हावी, तसेच या प्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढावा यासाठी मुंबई महापालिकेने मुंबईकरांसाठी वापरकर्त्यांसाठी अनुकुल अशी ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.

तक्रार किंवा अभिप्राय असा नोंदवा

मुंबईतील नागरिकांना ९३२४५००६०० या क्रमांकावर नाल्यातून गाळ काढण्याच्या तक्रारीसाठी तक्रारीचे नेमके ठिकाण, विभाग, दिनांक आणि वेळ आदी माहिती द्यावी लागणार आहे. जीपीएस लोकेशनसह फोटो टाकल्यास तक्रारीचे ठिकाण शोधण्यास अधिक उपयुक्त ठरेल. चॅटबॉट सिस्टिम अंतर्गत ही हेल्पलाईन असणार आहे. मात्र नागरिकांना तक्रारीसाठीचा पूर्ण तपशील सादर करावा लागणार आहे. पालिकक यंत्रणेकडे नालेसफाई कामांबाबत नागरिकांनी तक्रार दाखल केल्यानंतर तक्रारदारास एक तक्रार क्रमांक मिळेल. तक्रार निवारण केल्यावर त्याचा फोटो तक्रारदारास अवगत केला जाईल. सदर व्हॉट्सअप चॅटबॉट क्रमांक हा केवळ माहिती पाठविण्यासाठी उपलब्ध राहणार आहे. या क्रमांकावर कोणत्याही पद्धतीचे संभाषण करण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध नसेल.

तक्रारी सोडविण्यासाठी यंत्रणा

मुंबई महापालिकेच्या सर्व २४ विभागांतील पर्जन्य जलवाहिन्या विभागाच्या सहायक अभियंता आणि २४ विभाग कार्यालयात तक्रारी पाहण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

पावसाळ्यात मुंबईची तुंबई झाल्यास अधिकार्‍यांना घरी पाठवणार- मुख्यमंत्री

यंदाच्या पावसाळ्यात पाण्याचा निचरा नीटपणे झाल्यास महापालिकेच्या अधिकार्‍यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येईल, मात्र जर नालेसफाईची कामे केल्यानंतरही मुंबईची तुंबई झाल्यास व त्याचा त्रास मुंबईकरांना झाल्यास संबंधित अधिकार्‍यांवर कडक कारवाई करून त्यांना ‘नारळ’ देऊन घरी पाठविण्यात येईल, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकार्‍यांना महापालिका आयुक्त इकबाल चहल यांच्यासमोरच १९ मे २०२३ रोजी झापले. एवढेच नव्हे तर दरवर्षीप्रमाणे केवळ थातूरमातूर नालेसफाईची कामे नकोत. तसेच नदी व नाल्यांमधून किती टक्के गाळ काढला, किती टक्के नालेसफाई झाली याची आकडेवारी व टक्केवारी मला सांगू नका. ते महत्त्वाचे नाही. वास्तविक मिठी नदी व इतर नद्यांमधील आणि नाल्यांमधील गाळ हा तळापासून म्हणजे अगदी तळाला दगड लागेपर्यंत खोलवर जाऊन काढून प्रामाणिकपणे सफाई कामे करावीत. नालेसफाई कामांची जबाबदारी अधिकार्‍यांवर सोपवा, असे आदेशही त्यांनी आयुक्त व अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांना दिले.

- Advertisment -