घरमुंबईपत्राचाळच्या रहिवाशांना घर कधी मिळणार? हायकोर्टाने म्हाडाकडे मागितले उत्तर

पत्राचाळच्या रहिवाशांना घर कधी मिळणार? हायकोर्टाने म्हाडाकडे मागितले उत्तर

Subscribe

अमर मोहिते

 

- Advertisement -

मुंबईः पत्राचाळीचा पुनर्विकास कधी पूर्ण करणार आणि रहिवाशांना कधी घर मिळणार याची माहिती सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने म्हाडाला दिले आहेत. रहिवाशांना नियमित भाडे कधी दिले जाणार याचीही माहिती सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

न्या. गौतम पटेल व न्या. निला गोखले यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. येथील रहिवाशांना त्यांच्या हक्काचं घर मिळायला हवं. त्यांना घरभाडं मिळायला हवं हाच आमचा मुख्य हेतू आहे. याप्रकरणात म्हाडाचेही नुकसान झाले. आम्ही म्हाडाला दोष देत नाही. पण प्रकल्प कधी आणि कसा पूर्ण होईल हे म्हाडाने बघायला हवे. म्हाडा कायदेशीर काय करू शकते आणि काय करु शकत नाही हे आम्ही तपासू. पण म्हाडाने वेळेत हा प्रकल्प पूर्ण करायला हवा, असे मत न्यायालयाने व्यक्त केले.

- Advertisement -

याप्रकरणी कॅप्टन डॉ. राहुल रामचंद्र वाघ यांच्यासह सहा जणांनी याचिका केली. हे सर्व पत्राचाळ सोसायटीचे सदस्य आहेत. पत्राचाळीचा पुनर्विकास गुरु आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड करणार होती. तसेच म्हाडासाठीही इमारत बांधून दिली जाणार होती. विक्रीसाठी असलेल्या घरातून उत्पन्न् मिळाले की पत्राचाळीचा पुनर्विकास होणार होता. मात्र गुरु आशिष कंपनीने पत्राचाळ रहिवाश्यांची घरे व म्हाडाची इमारत बांधण्यास नकार दिला. आता हा पुनर्विकास म्हाडा करणार आहे. तसेच गुरु आशिष कंपनीने भाडेही थकवले आहे. त्यामुळे हे थकीत भाडे वसुल करण्यासाठी म्हाडा नेमके काय करणार आहे. म्हाडा कधीपर्यंत हा प्रकल्प पूर्ण करणार व रहिवाश्यांना कधी घर देणार याची माहिती सादर आदेश न्यायालयाने म्हाडाला दिले आहेत. यावरील पुढील सुनावणी १७ एप्रिलला होणार आहे.

दरम्यान,  गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे नाॅर्थ गोव्यातील संचालक राकेश कुमार वाधवान आणि सारंग कुमार वाधवान यांची संपत्ती ईडीने नुकतीच जप्त केली आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी ईडीने ही मोठी कारवाई केली आहे. या दोन्ही संचालकांच्या 31.50 कोटी रुपयांच्या दोन अचल संपत्ती म्हणजे इमराती ईडीमार्फ्त जप्त करण्यात आल्या आहेत.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -