कोण आहेत नीरज गुंडे? उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्याशी काय आहे कनेक्शन?

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांना सातत्याने लक्ष्य केल्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आता थेट माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे ड्रग्ज माफियांशी जवळचे संबंध असल्याचा गौप्यस्फोट करत खळबळ उडवून टाकली आहे.

फडणवीस यांचे ड्रग्ज पेडलर जयदीप राणा यांच्याशी जवळचे संबंध असल्याचा दावा मलिक यांनी केला असून या दोघांच्या फोटोचे टि्वट केले आहे.

तसेच नीरज गुंडे हा फडणवीसांचा मध्यस्थ म्हणून काम पाहायचा, अधिकारी आणि पोलिसांच्या बदल्या आणि त्या विभागाशी संबंधित कामंही तो मार्गी लावायचा असा आरोपही मलिक यांनी केला आहे.

मलिकांच्या या आरोपांमुळे चवताळलेल्या फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गुंडेशी जवळकीचे संबंध असल्याचा दावा केला आहे. यामुळे हे नीरज गुंडे आहे तरी कोण असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे.

नीरज गुंडे हे उद्धव ठाकरे यांचे मित्र आहेत. पण त्यांची नाळ मात्र आरएसएसबरोबर आहे.

नीरज गुंडे यांचे आजोबा दादरमधील आरएसएस संघाचे संचालक होते. तर त्यांची आत्या गीता गुंडे या आरएसएसच्या समन्वयक म्हणून काम पाहायच्या.

नीरज गुंडे यांचे ठाकरे कुटुंबीयांशी जिव्हाळ्याचे संबंध असल्याने मातोश्रीवर त्यांचे जाणे येणे होते.

२०१४ मध्ये शिवसेना भाजपमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी फडणवीस यांच्या विनंतीवरून मुंडे यांनी उद्धव आणि भाजपमध्ये मध्यस्थी करण्याचाही प्रयत्न केला होता.

गुंडे हे व्यवसायाने इंजिनियर असून चेंबूर येथे राहतात. त्यांच्या मितभाषी आणि संयमी स्वभावामुळे त्यांची तुलना उ्दधव ठाकरेंबरोबर केली जाते.

चर्चा करुन कुठलाही जटील प्रश्न सोडवण्यात नीरज गुंडे यांचे कसब आहे. राजकारणाबरोबरच त्यांचे कार्पोरेट क्षेत्राशी संबंध आहेत.

पण सध्याच्या राजकीय धुराळ्यात मातोश्री आणि गुंडे यांच्या संबंधात कडवडपणा आला आहे.

यामुळे गुंडे सध्या ठाकरे सरकारमधील मंत्र्यावरील कारवायांची माहिती टि्वट करत असतात.

बऱ्याचवेळा नीरज गुंडे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढवणारे विषयही सोशल मिडियावर मांडताना दिसतात.

राजकारण, कार्पोरेटक्षेत्राबरोबरच गुंडे यांची उठबस ही एनसीबी, सीबीआय कार्यालयाबरोबरच क्रिकेट क्षेत्रातही आहे. यामुळे या विभागाशी संबंधित अचूक माहिती गुंडे यांच्याकडे असते.

काँग्रेसचे घोटाळे, अंतर्गत बंडखोरी बाहेर काढण्याचे कामही गुंडे यांनी केले आहे.

पण एवढ्या सगळ्या मातब्बर व्यक्तींबरोबर उठबस करणाऱ्या गुंडे यांचे नाव याआधी कधीही पुढे आले नव्हते. पण मलिक यांच्या धमाक्यामुळे क्रुझ ड्रग्ज पार्टीवरून सुरू झालेले हे प्रकरण शेवटी राजकारणापर्यंत पोहचलं आहे.