घरमुंबईकोणता मुख्यमंत्री येणार विठ्ठलाच्या दारी? उद्धव ठाकरे की देवेंद्र फडणवीस

कोणता मुख्यमंत्री येणार विठ्ठलाच्या दारी? उद्धव ठाकरे की देवेंद्र फडणवीस

Subscribe

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडी सरकारचे संकटमोचक शरद यांना दोन वेळा राजीनामा दिला

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात सत्तापेच सुरु आहे. यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार जाणार की राहणार यावरून संघर्ष सुरु आहे. तर दुसरीकडे आषाढी एकादशीनिमित्त राज्यात पंढरपुरच्या विठ्ठलाचा वारीचा सोहळ्याचा उत्साह सुरु आहे. मात्र या सत्ता पेचात विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार की मी पुन्हा येईन असे म्हणणारे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार, यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर संभ्रम असून वाढला असून आषाढी एकादशीला दोन आठवडे शिल्लक असून ठाकरे सरकार गॅसवर आहे. यामुळे महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये ज्याप्रकारे बैठकांचे सत्र सुरु आहे त्यावरून उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा निश्चित असल्याचे म्हटले जातेय. त्यामुळे विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार की सत्तेत नव्याने येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे येणारा काळ स्पष्ट करेल.

महापूजेला विठ्ठलाच्या दारी उद्धव ठाकरे येणार की देवेंद्र फडणवीस?

10 जुलै 2022 रोजी (रविवारी) आषाढी एकादशी आहे. एकादशीच्या दिवशी दरवर्षी पहाटे राज्याचे मुख्यमंत्री सपत्नीक यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा काही अपवाद वगळता अखंडपणे सुरु आहे. मात्र यंदा महापूजेला विठ्ठलाच्या दारी उद्धव ठाकरे येणार की देवेंद्र फडणवीस यावर चर्चा सुरु आहे.

- Advertisement -

विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बंडखोर आमदारांवर केलेल्या अपात्रतेची कारवाई रोखण्यासाठी एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली, यावेळी सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पुढील सुनावणी 11 जुलैला ठेवली आहे. सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांच्यासह 15 बंडखोर आमदारांना जणांना 12 जुलैपर्यंत त्यांची बाजू लेखी सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. यामुळे 10 जुलैपर्यंत तरी महाविकास आघाडी सरकारला धोका नसल्याचे चित्र आहे. मात्र जर बंडखोर 41 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारला आमचा पाठिंबा नाही, असं म्हणत फ्लोअर टेस्टची मागणी केल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच यांच सरकार धोक्यात येण्याची शक्यता आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांना दोनचं पर्याय उपलब्ध असणार आहेत ते म्हणजे एकतर सरकार ठिकवण्यासाठी बहुमत सिद्ध करणे नाही तर राजीनामा देणे. त्यामुळे बंडखोर आमदारांच्या भूमिकेवर आता विठ्ठलाच्या दारी कोण मुख्यमंत्री म्हणून पोहचणार हे स्पष्ट होईल.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडी सरकारचे संकटमोचक शरद यांना दोन वेळा राजीनामा दिला. मात्र शरद पवारांनी सरकार वाचवण्यासाठी त्यांनी दोनही वेळा रोखल्याची माहिती समोर आली. नाही तर राज्यातील सरकार केव्हाचं कोसळलं असतं. मात्र आषाढी एकादशीच्या तोंडावर ठाकरेविरुद्ध शिंदे हा राजकीय वाद आता सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचल्याने सत्ता परिवर्तनाच्या हालचालींना वेग आला आहे. यात मुख्यमंत्र्यांनी स्वत:हून राजीनामा दिल्यास नव्याने सत्तेत येणाऱ्या सरकारच्या मुख्यमंत्र्याकडे विठ्ठलाच्या महापूजेचा मान जाणार आहे.

- Advertisement -

यंदा आषाढी वारी सोहळा दोन वर्षांनंतर मोठ्या उत्साहात पार पडत आहे. संत ज्ञानेश्वरांसह अनेक मानाच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत आहेत. तर पायी प्रवास करुन जाणाऱ्या पालख्या 9 जुलैला पंढरपूरला पोहचतील. यानंतर पुंढरपुरात 10 जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा पार पडेल. विठ्ठलाच्या शासकीय पूजेचा मान हा अनेक वर्षांपासून मुख्यमंत्र्यांकडे आहे. यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर 2020 पासून गेली दोन वर्षे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा झाली. कोरोना काळात तर चक्क ठाकरे यांनी स्वत: गाडीचे स्टेअरिंग हातात घेत पंढरपूरपर्यंत आठ तास ड्राईव्ह करून पूजेचा मान घेतला. यानंतर यंदाही लोकांच्या मनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच महापूजा करावी अशी इच्छा आहे. यावरून सोशल मीडियावरही चर्चांना उधाण आलेय.

दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त राज्याच्या मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते पंढपुरच्या पांडुरंगाची महापूजा होते. त्याप्रमाणे कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही पुजा केली जाते. यामुळे गेल्या दोन वर्षांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापूजा केली जात आहे. मात्र राज्यात सत्ता परिवर्तन होत शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केल्यास हा मान उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नीला मिळणार असल्याची चर्चा राजकीय गोटात होत आहे. आता आषाढी एकादशीला अवघे 13 दिवस शिल्लक आहेत. यात राज्यातील राजकीय घडामोडी ज्या वेगाने सुरू आहे ते पाहता आता येणारा काळ ठरवेल की विठ्ठलाच्या दारी नेमका कोणता मुख्यमंत्री जाणार आहे?


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -