घरताज्या घडामोडीउन्हाळ्यात आगीच्या दुर्घटनांचे प्रमाण का वाढते ? ही आहेत कारणे आणि उपाययोजना

उन्हाळ्यात आगीच्या दुर्घटनांचे प्रमाण का वाढते ? ही आहेत कारणे आणि उपाययोजना

Subscribe

सामान्यत कुठल्याही मोसमात घडणाऱ्या आगीच्या दुर्घटनांचे प्रमाण उन्हाळ्यात का वाढत. हे जाणून घेणं आणि त्या टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या हे समजून घेणं महत्वाच आहे.

गेल्या काही दिवसांपासून विशेषत उन्हाळ्यात मुंबईसह देशातील अनेक राज्यांमध्ये आगीच्या दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर तसेच इतर ठिकाणी भीषण आग लागल्याच्या घटना घडल्या. यात काही ठिकाणी वित्तहानीबरोबरच मनुष्यहानीही झाली. विशेष म्हणजे या आगीच्या दुर्घटना रहीवासी इमारती, कार्यालये, कारखाने, वाहने, रुग्णालयांना लागल्या होत्या. काही दिवसांपूर्वी दिल्लीतील मुंडका येथेही खासगी व्यावसायिक इमारतीला आग लागली. त्यात २७ जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले. यामुळे सामान्यत कुठल्याही मोसमात घडणाऱ्या आगीच्या दुर्घटनांचे प्रमाण उन्हाळ्यात का वाढत. हे जाणून घेणं आणि त्या टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्या हे समजून घेणं महत्वाच आहे.

प्रामुख्याने उन्हाळ्यात आग लागण्याच्या घटनांचे मूळ कारण हे इलेक्ट्रॉनिक वस्तूंशी संबंधित आहे. उन्हाळ्याच्या दिवसात घराघरात एसी, पंखे, कूलर यासारख्या इलेक्ट्रीक वस्तुंचा अतिवापर केला जातो. यामुळे मशीनवर ताण येतो. यातून मग विजेच्या तारेतून ठिणकी म्हणजे स्पार्कींग होते, कधी शॉर्ट सर्किट होते यामुळे आग लागण्याचा धोका अधिक वाढतो. गेल्या काही दिवसात घडलेल्या आगीच्या घटनांमागचे कारण यातीलच एक आहे.

- Advertisement -

त्यातही घराला आग लागण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. यातील पहीलं कारण आहे. जुन्या विजेच्या तारांमुळे होणारे शॉर्ट सर्किट आणि दुसरे कारण आहे घरगुती सिलेंडरमधून होणारी गॅस गळती. या दोन्ही कारणांमागे लोकांचा निष्काळजीपणा आणि दुर्लक्षित कारभार हे देखील कारणीभूत आहेत. तसेच इलेक्ट्रॉनिक वस्तूंबद्दल असलेले अज्ञान हे देखील आगीच्या दुर्घटनांमागचे महत्वाचे कारण आहे. आजही बऱ्याच घरांमध्ये गॅसवर अन्न शिजवून झाल्यावर सिलेंडरचे बटन बंद करण्यात येत नाही. यामुळे अनेकवेळा गॅस गळतीमुळे देखील आगीच्या घटना घडतात. यामुळे नागरिकांनी गॅस बरोबरच घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू सावधपणे हाताळायला हव्यात.

आगीच्या दुर्घटना टाळण्यासाठी काय कराल?

- Advertisement -

घर किंवा इमारतींच्या जुन्या झालेल्या विजांच्या तारा तात्काळ बदला.

जर घऱातील वीज तारा जुन्या असतील तर एसी कूलर, फ्रिज, वॉशिंग मशीन, ओव्हन यांचा अतिरिक्त भार या जुन्या तारांवर पडतो. यामुळे वेळोवेळी वीजतारांची तपासणी करावी.
एसी, कूलर आणि पंख्यांची नियमित सर्विसिंग करावी.

एकाच वेळी एसी, कूलर आणि वॉशिंग मशीन, फ्रिज, ओव्हन यासारखी इलेक्ट्रॉनिक सुरू करू नयेत.

बाहेर जाताना घरातील लाईट, पंखे, फ्रिज बंद करावे. मॅन स्वीच बंद करावे.

एसी २४ तास सुरू ठेवू नये. मध्ये मध्ये बंद करावा.

मोबाईल आणि लॅपटॉप उशीरापर्यंत चार्जिंगला लावून ठेवू नये

सार्वजनिक ठिकाणी जिथे मोठ्या प्रमाणावर लोकांचा वावर असतो अशा कारखाने, रुग्णालय, शाळा, कॉलेज, ऑफिसेस, उंच रहिवासी आणि व्यावसायिक इमारतींमध्ये फायर सेफ्टीची सोय करावी.

तसेच अशा ठिकाणी वॉटर टँकमध्ये नेहमी पाण्याचा साठा असायला हवा.

फायर अलार्म आणि स्मोक डिटेक्टरची नियमित चाचणी करावी

फायर एग्झिट गेटची पाहणी करावी

सुरक्षा कर्मचाऱ्यांबरोबरच इतर व्यक्तीनांही फायर सेफ्टीबद्दल माहिती असायला हवी.

वीज तारा उघड्या किंवा लोंबकळत ठेवू नयेत

ज्वलनशील पदार्थ घराच्या छतावर ठेवू नये.

गॅस शेकडीच्या आजूबाजूला कपडे, प्लास्टीक, सुके गवत असू नये.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -