घरमुंबईसंजय राठोडांची चौकशी का होत नाही? दरेकरांचे पोलीस महासंचालकांना पत्र

संजय राठोडांची चौकशी का होत नाही? दरेकरांचे पोलीस महासंचालकांना पत्र

Subscribe

पूजा चव्हाण प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी

पूजा चव्हाण प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांच्याविरोधात पुरावे असुनही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि चित्रा वाघ यांनी पोलीस महासंचालकांची भेट घेतली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांची भेट घेऊन संजय राठोड प्रकरणामध्ये भाजप नेत्या चित्रा वाघ यांना आलेल्या धमक्यांची तक्रार करण्यासाठी तसेच पूजा चव्हाण प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. तसेच पोलीस महासंचालकांना, मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनाही पत्र पाठवून ९ ते १० प्रश्नांची उत्तरे जनतेला देण्याची मागणी केले असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

काय आहेत प्रश्न

– ७ फेब्रुवारीपासून आजपर्यंत १७ दिवस झाले अरूण राठोड बेपत्ता आहे. हा या घटनेतला महत्त्वाचा दुवा त्याचा शोध घेण्यासाठी पोलीस काय करत आहेत.
– अरुण राठोडला बेपत्ता कोण करू शकते? याबाबतीत काही व्यक्ती संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यांच्याकडे आतापर्यंत पोलीस का गेले आहेत. गेले असतील तर काय स्थिती आहे. ही राज्यातील जनतेला समजली पाहिजे
– अरुण राठोड यांचे नातेवाईक सुद्धा त्यांच्या गावातून बेपत्ता झाले आहेत. आणि त्यांच्या कुटूंबाचे बरेवाईट झाले कींवा कसे अशा प्रकारची भीती जनतेच्या मनात झाले आहे.
– १७ दिवसांत त्यांचाही शोध घेण्यात पोलीस अपयशी ठरले आहेत. याबाबत पोलीस काय करत आहेत. हे राज्यातील जनतेला विरोधी पक्षनेता म्हणून महासंचालकांकडून समजण्याचा प्रयत्न केला.
– अरुण राठोड याच्या मूळगावी असलेल्या घरात चोरी झाली असून, या चोरीची पोलीसांनी चौकशी केली का? या चोरीची वस्तूस्थिती काय आहे? या चोरीत संशयास्पद वस्तू चोरी झाले असल्याचे संशय आहे. की ज्याच्यामध्ये या – प्रकरणा संबंधात अनेक पुरावे हाती येऊ शकतात
– या घटनेला घडून १७ दिवस झाले आहेत. पोलीसांनी या घटनेची चौकशी केली का? चौकशी केली असेल तर कोणाकोणाची चौकशी केली?
– ऑडिओ क्लीप प्रकरी जे संशयित आहेत त्यांच्यावर का कारवाई केली नाही? याचे उत्तर राज्यातील जनतेला हवे आहे.
– पूजा चव्हाण यांचे कुटूंब प्रचंड दबावाखाली आहे. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
– यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात अरुण राठोड व एक महिला दाखल झाली होती. त्या महिलेच्या नावाची नोंद पूजा चव्हाणच्या नावाशी मिळती-जूळती आहे.
– जी पूजा राठोड महिला गर्भपात करायला गेली होती, ती महिला आता कुठे आहे ? त्या महिलेला समोर आणणे गरजेचे आहे.
– पूजा चव्हाणचेच रुग्णालयात पूजा अरुण राठोड नाव दाखल केले होते.
– संशयित मंत्र्यापर्यंत पोलीस गेली १५ दिवसांपासून पोहचले नाहीत? पुरावे नष्ट केल्याचा संशय जनतेच्या मनामध्ये आहे.

- Advertisement -

या प्रश्नांवरुन पोलीसांना चौकशीला आणखी मदत होणार आहे. परंतु पोलीस सरकारच्या दबावाखाली हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे प्रथम दर्शनी दिसत आहे. ऑडियो क्लिपमध्ये ज्यांचा आवाज आहे त्यावरुन पूजाच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. त्या मंत्रीमंडळातील संबंधित चौकशी करणे तातडीने गरजेचे असताना पोलीस चौकशी का करत नाहीत हा राज्यातील जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे.


हेही वाचा : पोहरादेवी गर्दीप्रकरणी आपला माणूस असेल तरी कारवाई होणार – संजय राऊत

- Advertisement -

मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेला गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. परंतु त्यांच्याच पक्षातील मंत्री पोहरादेवी येथे गर्दी करतो. १० हजार लोकांवर गुन्हे दाखल केल्याचे सांगितलेजात आहे. परंतु ज्याच्यामुळे गर्दी झाली त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यांना का वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तुमच्याय पक्षातील मंत्री नियम पाळत नसेल तर समाजाला नियम पाळण्याचे नैतिक अधिष्टान तुम्ही पाळू शकत नाही असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.

या प्रकरणाची चौकशी करणारे पोलीस कमिश्नर अमिताभ गुप्ता यांची भूमिका संशयास्पद आहे. वाधवान प्रकरणात अमिताभ गुप्तांवर कारवाई केली होती. परंतु कारवाईनंतरही अधिकारी मोठ्या कॉर्पोरेशनमध्ये पोलीस आयुक्त म्हणून येतो यावरुन त्याचे असलेले हितसंबंध आणि जिव्हाळ्याचे संबंध दिसून येतात. त्याचीच भरपाई म्हणून सरकारला पाठीशी घालण्याचा प्रयत्न कमीश्नरच करत आहेत. परंतु या प्रकरणात योग्य चौकशी करुन कारवाई झाली पाहिजे अशी आग्रही मागणी केली असल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.


हेही वाचा : गर्दीतील लोकांवर गुन्हे दाखल मात्र गबरुवर कारवाई नाही, शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -