घरCORONA UPDATEहाच का तो वरळी पॅटर्न? भाजपचा सवाल

हाच का तो वरळी पॅटर्न? भाजपचा सवाल

Subscribe

वरळी पॅटर्नवर टिका करणाऱ्या भाजपने पुन्हा एकदा या विभागाचे आमदार आणि मंत्री असलेल्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे.

वरळी आणि डिलाईड रोडवरील बीडीडी चाळीचा परिसर लॉकडाऊन केल्यानंतर वरळी पॅटर्नवर टिका करणाऱ्या भाजपने पुन्हा एकदा या विभागाचे आमदार आणि मंत्री असलेल्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. वरळीत निकृष्ट दर्जाचे रेशन मिळत असल्याची बाब विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर हाच का तो वरळी पॅटर्न? असा सवाल करत भाजपने कुठे आहेत युवराज अशी विचारणा केली.

हाच का तो वरळी पॅटर्न? वरळीत सुध्दा खराब धान्य! विरोधी पक्षनेते कांदिवलीहून वरळीत पोहोचलेत. मित्रांनो, राजकारण करू नका. पण त्रस्त जनतेला किमान एवढे तरी सांगा… कुठे आहेत युवराज असा सवाल भाजपचे प्रवक्ते व मुंबई महापालिकेचे नामनिर्देशित सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले. या विभागात बुधवारी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी रेशनदुकानांवर निकृष्ट दर्जाचे धान्य मिळत असल्याची बाब पुराव्यासह निदर्शनास आणून  दिली. कोरोनाग्रस्तांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी कोळीवाड्यात राबवण्यात येणाऱ्या प्रयत्नांबाबत सत्ताधारी पक्षाने वरळी पॅटर्न असे नाव दिले आहे.

- Advertisement -

एका बाजुला कोळीवाड्याच विशेष लक्ष देणाऱ्या आमदार, मंत्री व प्रशासनातील  अधिकाऱ्यांनी वरळी व डिलाईड रोडवरील बीडीडी चाळ तसेच आसपासच्या वस्त्यांमध्ये दुर्लक्ष केला. परिणामी या सर्व वस्त्या व चाळींमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढून प्रशासनाला आता पोलिसांच्या मदतीने पूर्णपणे लॉकडाऊन घोषित करण्याची वेळ आली आहे. त्यावेळी भालचंद्र शिरसाट यांनी महापौरांनी टीव्ही चॅनेलला दिलेल्या माहितीचा व्हीडीओ फिरत हा वरळी पॅटर्न असा सवाल केला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -