घरताज्या घडामोडीपतीला चुना लावून पत्नी फरार; पतीने केली अपहरणाची तक्रार

पतीला चुना लावून पत्नी फरार; पतीने केली अपहरणाची तक्रार

Subscribe

मुंब्रामध्ये अल्पवयीने मुलीने कुटुंबीय झोपत असताना घरातून पोबारा केल्याच्या दोन घटना घडला आहे.

सकाळी मजुरीच्या कामासाठी गेलेल्या पतीला चुना लावून पत्नीने पलायन केल्याची घटना दिवा जीवदानी नगरमध्ये घडली. तर मुंब्रा स्मार्ट नगरमध्ये एका अल्पवयीन मुलीने कुटुंबीय झोपेत असतानाच घरातून पोबारा केल्याच्या दोन घटना मुंब्रा परिसरात घडल्या. दोन्ही प्रकरणाची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात करण्यात आलेली आहे. मुंब्रा पोलीस अपहृत महिला आणि अल्पवयीन मुलीचा शोध घेत आहेत.

नक्की काय घडले?

तक्रारदार ब्रिजेश लालजी मिश्रा (वय २८) हा पत्नी सोबत दिवा पूर्व भागातील जीवदानी नगर परिसरात राहत होता. तो मजुरी करून उदरनिर्वाह करीत होता. ४ जानेवारी रोजी नेहमी प्रमाणे ब्रिजेश मिश्रा हे कामासाठी सकाळीच गेला होता. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास परत आला. तेव्हा घराला टाळे लावलेले आढळले. ब्रिजेशने आसपासच्या रहिवाशांना विचारणा केल्यानंतर त्यांची पत्नीने घराची चावी देऊन गेल्याचे नागरिकांनी सांगितले. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात पत्नीचे अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची तक्रार नोंदविली आहे. दुसरी घटना मुंब्रा परिसरात सम्राट नगरमध्ये राहणारे तक्रारदार बिल्कीज शेख (वय ३२) हे ४ जानेवारी रोजी रात्री झोपले. दरम्यान ५ जानेवारी रोजी पहाटे बिल्कीज यांची १६ वर्षीय तरुणी पहाटे घरातून कुटुंबीयांना झोपेत ठेवूनच पळून गेली. पालकांना सकाळी जाग आल्यानंतर त्याची मुलगी घरात नसल्याचे समोर आले. त्यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात अपहृत मुलींबाबत तक्रार नोंदविली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – केडीएमसीत भाजप शिवसेनेला देणार आणखी एक धक्का


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -