शरण येत नसेल तर अटक करा; कोर्टाचे आदेश, पतीची हत्या ६९ व्या वर्षी पत्नीला भोवली

ही घटना १७ मे १९९८ राजी सायंकाळी ६ वाजता नौपाडा येथे घडली. पत्नीने पतीच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. त्यामुळे पतीचा मृत्यू झाला. पोलिसांनी पत्नीला अटक केली. पत्नीविरोधात ठाणे सत्र न्यायालयात खटला चालला. पती नशेबाज होता. यावरुन पती पत्नीमध्ये सतत वाद होत होते. त्यांच्यातील वाद नवीन नव्हता, अशी साक्ष त्यांच्या शेजारच्यांनी न्यायालयात दिली. ठाणे सत्र न्यायालयाने पत्नीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याविरोधात पत्नीने उच्च न्यायालयात याचिका केली.

bombay high court

मुंबईः सुमारे २३ वर्षांपूर्वी पत्नीने पतीची हत्या केली. त्यावेळी पत्नीचे वय ४५ वर्षे होते. आता तिचे वय अंदाजे ६९ वर्षे आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या पत्नीला पतीच्या हत्येप्रकरणी सात वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा भोगण्यासाठी पत्नीने पोलिसांना शरण यावे. पत्नी शरण नाही आली तर तिला पोलिसांनी अटक करावी. अटक करुन तिला कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी पाठवावे, असे आदेश न्यायालयाने ठाण्यातील नौपाडा पोलिसांना दिले आहेत.

ही घटना १७ मे १९९८ राजी सायंकाळी ६ वाजता नौपाडा येथे घडली. पत्नीने पतीच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. त्यामुळे पतीचा मृत्यू झाला. पोलिसांनी पत्नीला अटक केली. पत्नीविरोधात ठाणे सत्र न्यायालयात खटला चालला. पती नशेबाज होता. यावरुन पती पत्नीमध्ये सतत वाद होत होते. त्यांच्यातील वाद नवीन नव्हता, अशी साक्ष त्यांच्या शेजारच्यांनी न्यायालयात दिली. ठाणे सत्र न्यायालयाने पत्नीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याविरोधात पत्नीने उच्च न्यायालयात याचिका केली.

न्या. सुनील शुक्रे व न्या. अभय वाघाशे यांच्या खंडपीठासमोर या आव्हान याचिकेवर सुनावणी झाली. पतीला मारण्याचा पत्नीचा कोणताच हेतू नव्हता. अचानकपणे ही घटना घडली. रागाच्या भरात पत्नीने पतीच्या डोक्यात लोखंडी रॉड घातला. त्यात त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे ठाणे सत्र न्यायालयाने ठोठावलेली शिक्षा अयोग्य आहे, असा दावा पत्नीकडून करण्यात आला.

न्यायालयाने त्याची नोंद करुन घेतली. या प्रकरणात हत्येच्या गुन्ह्यासाठी ठोठावलेली शिक्षा योग्य आहे की योग्य असा प्रश्न न्यायालयासमोर होता. ही घटना पूर्वनियोजित नव्हती. पण लोखंडी रॉड डोक्यात मारला तर मृत्यू होऊ शकतो याची शक्यता कोणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे पत्नीला सदोष मनुष्य वधासाठी सात वर्षांची शिक्षा ठोठावली जात आहे. ही शिक्षा भोगण्यासाठी पत्नीने नौपाडा पोलिसांना शरण यावे. पत्नी शरण आली नाही तर पोलिसांनी तिला अटक करावी. अटक केल्यानंतर तिला कारागृहात शिक्षा भोगण्यासाठी पाठवावे, असे आदेश न्यायालयाने नौपाडा पोलिसांना दिले आहेत.