घरमहाराष्ट्रएकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार…, अमित शाहांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा दावा

एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार…, अमित शाहांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा दावा

Subscribe

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (4 जून) दिल्ली दौऱ्यावर अमित शाह यांची भेट घेतली. यावेळी कोणत्या विषयावर चर्चा झाली असेल याबाबत राजकीय वर्तुळात उधाण आले. एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या भेटीनंतर ट्वीट करत एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार असल्याचे म्हटले आहे. (Will contest combined elections and win with majority…, Chief Minister Shinde claims after meeting Amit Shah)

एकनाथ शिंदे ट्विटरमध्ये म्हटले की, रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली असल्याचे एकनाथ शिंदे यांनी लिहिले आहे. 

- Advertisement -

एकनाथ शिंदे म्हणाले की, राज्यात आगामी सर्व निवडणूका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, राखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार…, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या भेटीनंतर व्यक्त केला आहे. 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -