घरमुंबईनाकावर टिचून मराठी स्वाक्षरी कार्यक्रम करु, संदीप देशपांडेचे मोठे वक्तव्य

नाकावर टिचून मराठी स्वाक्षरी कार्यक्रम करु, संदीप देशपांडेचे मोठे वक्तव्य

Subscribe

मनसेने एखादा कार्यक्रम करण्याचे ठरविले की पोलिसांच्या पोटात का दुःखते?

महाराष्ट्रात मराठी भाषेला प्राधान्य मिळण्यासाठी मनसे नेहमी आक्रमक भूमिकेत दिसते. मराठी भाषेवरुनच पुन्हा मनसे आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. मराठी भाषा दिनानिमित्त मनसेने २७ फेब्रुवारीला मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. परंतु कोरोनाचे कारण देत पोलिसांनी या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहेमराठी भाषा स्वाक्षरी दिन सरकारच्या आणि मुंबई पोलिसांच्या नाकावर टिचून करु असे मनसे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात मराठी भाषेला प्राधान्य मिळण्यासाठी मनसे नेहमी आक्रमक भूमिकेत दिसते. मराठी भाषेवरुनच पुन्हा मनसे आणि शिवसेनेत वादाची ठिणगी पडली आहे. मराठी भाषा दिनानिमित्त मनसेने २७ फेब्रुवारीला मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. परंतु कोरोनाचे कारण देत पोलिसांनी या कार्यक्रमाची परवानगी नाकारली आहे. यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

मराठी भाषा दिनानिमित्त मनसेने दादरमधील शिवाजी पार्क येथे मराठी भाषा स्वाक्षरी कार्यक्रमाचे आयोजन करण्याची परवानगी मागिती होती. या मराठी स्वाक्षरी कार्यक्रमाची परवनागी मुंबई पोलिसांनी नाकारली आहे. कार्यक्रमाची परवानगी नाकारल्याची नोटीस मनसेचे अमेय खोपकर यांना पाठवण्यात आली आहे. या प्रकरणावर मनसेचे सरचिटणीस यांनी हा कार्यक्रम पोलिसांच्या नाकावर टिचून आम्ही करणार असल्याचे मुलाखतीदरम्यान म्हटले आहे.

- Advertisement -

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, मनसेने एखादा कार्यक्रम करण्याचे ठरविले की पोलिसांच्या पोटात का दुःखते? संजय राठोडच्या शक्तिप्रदर्शनावेळी पोलिस काय करत होते. संजय राठोड यांच्यावर का कारवाई करण्यात आली नाही. मनसेच्या कार्यक्रमात कोरोना दिसतो का? संजय राठोड यांच्या शक्तिप्रदर्शनात हजारोंची गर्दी झाली तेव्हा कोरोना नव्हता का? असा प्रश्नही सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

संजय राठोड यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. यावर संदिप देशपांडे यांनी म्हटले आहे की, संजय राठोड यांच्यावर खरंच कारवाई करण्यात आली आहे का? काही झाले तरी मराठी स्वाक्षरी कार्यक्रम आम्ही करणारच सर्व नियमांचे पालन करुन हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करणारच असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : लोकल फेऱ्या कमी करण्याचा प्रयत्न, पुन्हा लॉकडाऊन होणार? वडेट्टीवार यांचे मोठे वक्तव्य


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -