घरमुंबईमुंबई आयची जागा हलविणार?

मुंबई आयची जागा हलविणार?

Subscribe

वांद्रे ऐवजी दुसर्‍या जागांसाठी इच्छुकांची मागणी

लंडन येथील लंडन आयच्या धर्तीवर मुंबई बांधण्यात येणारे मुंबई आय लवकरच इतरत्र हलविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्य सरकारने यासाठी वांद्रे येथील रिक्लेमेशनची जागा निश्चित केली असताना, येथील जागा मर्यादित असल्याने येथे मुंबई आयची उभारणी येथे शक्य नसल्याने प्रस्तावित मुंबई आय इतरत्र हलविण्याची सूचना हा प्रकल्प निर्मितीसाठी इच्छुक असणार्‍या कंपन्यांनी दर्शविली आहे. वांद्रे येथील जागा मर्यादित असल्याने ही मागणी करण्यात आली असल्याचे समोर आले आहे.

मुंबईच्या शिरेपेचात मानाचा तुरा रोवावा, या उद्देशाने वांद्रे येथील रिक्लेमेशनजवळ मुंबई आय उभारण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. या घोषणेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए)याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच या प्रकल्पासाठी इच्छुक असलेल्या कंपन्यांची विशेष बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत अनेक कंपन्यांसाठी प्राथमिक स्तरावर सादरीकरण देखील करण्यात आल्याची माहिती पुढे आली असून साधारण आठ कंपन्या या प्रकल्पासाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे. या बैठकीत यावेळी अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून वांद्रे रिक्लेमेशन येथील जागा अपुरी असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रकल्प इतरत्र हलविण्यात येईल का, असा प्रश्न इच्छुक कंपन्यांकडून दाखविण्यात आला आहे.

- Advertisement -

दरम्यान, या बैठकीत अनेक मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून या प्रकल्पासाठी एकूण किती वर्षांचा निधी अपेक्षित आहे. यासाठी लागणारी पार्किंगची व्यवस्था होऊ शकते का? तर या प्रकल्पाची उंची साधारण किती असावी यासारख्या अनेक बाबींवर चर्चा झाल्याची माहिती पुढे आली अहे. या प्रकल्पांसाठी परदेशातील यंत्रसामुग्री राज्यात आणावी लागणार आहे. त्यामुळे यासाठी काही सवलत देता येईल का याबाबत ही चर्चा झाल्याचे कळते. त्याशिवाय मुंबई आय ज्या ठिकाणी सुरू करण्यात येईल, त्या ठिकाणी काही वॉटर स्पोर्टस सुरू करण्यात येईल का? यासारख्या अनेक मुद्यांवर चर्चा करण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे. वरील सर्व बाबी लक्षात घेता मुंबई आयसाठी इतरत्र जागा मिळते का? याबाबत विचारणा झाल्याचे कळते. त्यामुळे आता मुंबई आय नेमके कुठे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लवकरच निविदा
या प्रकल्पासाठी आठ कंपन्यांनी उत्सुकता दाखविली असून लवकरच याची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात येणार असल्याची माहिती एका अधिकार्‍यांकडून देण्यात आली आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही केली जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -