दक्षिण मुंबई युवक जिल्हाध्यक्ष पदी यंदा एक महिला बाजी मारणार असल्याची चर्चा युवक काँग्रेस कार्यकर्त्यांत केली जात आहे. भारतीय युवक काँग्रेस तर्फे ११ नोव्हेंबर ते ११ डिसेंबर या कालावधीत सदस्य नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. तर विथ आय.वाय.सी या App (With IYC) वर मतदान सुरू आहे. दक्षिण मुंबईतून उमेदवार निवडून यावेत यासाठी युवक काँग्रेसने कंबर कसली आहे. अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज भरला असून यामध्ये तरुण महिला कार्यकर्त्या हिना गजाली यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर त्यांच्यासोबत आमदार अमिन पटेल आणि दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष सुनील नरसाळे यांच्या मर्जीतले असलेले अदनान पारेख हे देखील निवडणुकीसाठी उभे राहिले आहेत.

तसेच माजी आमदार आणि मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष मधू अण्णा चव्हाण आणि भवर सिंग राजपुरोहित यांच्या मर्जीतले दर्शित जैन हे देखील आपले नशीब आजमावत आहेत. राहुल गांधी यांनी अंतर्गत निवडणूक प्रक्रिया राबवली आहे. ही संधी पाहून तरुण काँग्रेस कार्यकर्ता हिना गजाली यांन्नी अर्ज भरला आहे. तिला कोणत्याही नेत्याचा पाठिंबा नसतानाही ती चांगली लढत देत आहे. महिलांनाही संधी देऊन काँग्रेस मजबूत करावी. त्याप्रमाणे एक महिला युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली तर मुंबई युवक काँग्रेसच्या इतिहासात पहिल्यांदाच एक महिला जिल्हाध्यक्ष झाल्याचा इतिहास होईल.
हेही वाचा – ‘सरनाईक कुटुंबावरील ईडा-पिडा टळो’