घरमुंबईCorona vaccine तयार करण्यास वर्षभराचा कालावधी लागणार- Haffkine

Corona vaccine तयार करण्यास वर्षभराचा कालावधी लागणार- Haffkine

Subscribe

हाफकिन संस्थेस भारत बायोटेककडून तंत्रज्ञान हस्तांतरण पद्धतीने कोवॅक्सिन बनविण्यास केंद्र शासनाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने मान्यता दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान, ही एक दिलासादायक बातमी आहे. दरम्यान, केंद्राकडून ही कोरोनाची लस विकसित करण्यास सहा महिन्यांची अपेक्षित वेळ दिली आहे, असे असले तरी देखील कोवॅक्सिन लस बनविण्यास हाफकीन बायोफार्मा (Haffkine Biopharma) इन्स्टिटयूटला कमीत कमी एक वर्ष लागणार असल्याचे सांगितले जात आहे.

तसेच, ठरलेल्या नियोजनाप्रमाणे झाले तर वर्षभरात हाफकिन इन्स्टिटयूटमध्ये उत्पादित केलेली लस प्राप्त होऊ शकते. एका वर्षभरात २२.८ कोटी इतक्या डोसेजची निर्मिती करण्याची क्षमता या इन्स्टिटयूटची आहे. त्यामुळे आगामी काळात देशासाठी मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होणार असल्याचा अंदाज आहे. केवळ सुविधा तयार करण्यास सहा महिन्यांचा कालावधी लागतो, त्यानंतर वैधता, मंजूरी मिळण्याची प्रक्रिया आणि त्याच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात येते. ही प्रक्रिया वेगवान करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे हाफकिन इन्स्टिटयूटचे एमडी संदीप राठोड यांनी सांगितले. त्यामुळे लस विकसित करण्यासाठी केंद्राकडून सहा महिन्यांची अपेक्षित वेळ दिली असली तरी देखील हाफकिन इन्स्टिटयूटला कमीतकमी वर्षभराचा कालावधी लागणार आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दोन महिन्यापूर्वीच हाफकिनमध्ये लस निर्मितीला परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनीही पंतप्रधानांना पत्र लिहून हाफकिन इन्स्टिट्यूट आणि हिंदुस्तान अँटिबायोटिकलला लस उत्पादन करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी देखील केली होती. अखेर केंद्र सरकारकडून ही परवानगी मिळाली आहे.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -