घरट्रेंडिंगवाईन पिऊन गाडी चालवल्यास जेलमध्ये जाणार की बारमध्ये?; युझरच्या प्रश्नावर मुंबई पोलिसांचं...

वाईन पिऊन गाडी चालवल्यास जेलमध्ये जाणार की बारमध्ये?; युझरच्या प्रश्नावर मुंबई पोलिसांचं भन्नाट उत्तर

Subscribe

मुंबई पोलिसांच ट्विटर अकाऊंट म्हणजेच एकंदरीत सोशल मिडिया अकाऊंटवर मुंबई पोलिस मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यावरुन नेहमीच नागरिकांपर्यंत संदेश पोहचवणारे धमाकेदार व्हिडिओ, फोटो शेअर करत असतात. त्यातही भन्नाट क्रिएटिव्हिटी दिसून येते. दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळात सुपरमार्केटमध्ये वाईन (wine) विकण्यास परवानगी देण्याबाबत निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर आता सुपरमार्केटमधून वाईन खरेदी करता येणार आहे. या निर्णयाचे समर्थन करताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की,वाइन म्हणजे दारू नाही.

मुंबई पोलिसांच ट्विटर अकाऊंट म्हणजेच एकंदरीत सोशल मिडिया अकाऊंटवर मुंबई पोलिस मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. त्यावरुन नेहमीच नागरिकांपर्यंत संदेश पोहचवणारे धमाकेदार व्हिडिओ, फोटो शेअर करत असतात. त्यातही भन्नाट क्रिएटिव्हिटी दिसून येते. दरम्यान काही दिवसांपूर्वी राज्य मंत्रिमंडळात सुपरमार्केटमध्ये वाईन (wine) विकण्यास परवानगी देण्याबाबत निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या निर्णयानंतर आता सुपरमार्केटमधून वाईन खरेदी करता येणार आहे. या निर्णयाचे समर्थन करताना शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की,वाइन म्हणजे दारू नाही. आणि दारूची विक्री जास्त झाल्यास शेतकऱ्यांना फायदा होईल. याच मुद्द्यावर एका युझरने मुंबई पोलिसांना गंमतीत विचारले की, ‘मला दारू पिऊन गाडी चालवताना पकडले तर मुंबई पोलीस मला जवळच्या बारमध्ये घेऊन जातील की जेलमध्ये बंद करतील? असा प्रश्न शिवम वाहिया नावाच्या युझरने ट्विटरवर विचारला आहे.

- Advertisement -

मुंबई पोलिसांनीही या युझरला अतिशय मजेदार आणि अचूक उत्तर दिले. सर, आम्ही तुम्हाला ‘जबाबदार नागरिक’ म्हणून मद्यपान केल्यानंतर बारमधून उठून ड्रायव्हर असलेल्या गाडीत बसण्याची आम्ही शिफारस करतो. यासोबतच मुंबई पोलिसांनी गंमतीत लिहिलं आहे, की जर तुम्ही दारूच्या नशेत गाडी चालवली. त्यांनंतर जर ब्रेथलायझरमध्ये तुमच्या ड्रिंकमध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळले, तर तुम्हाला आमचा पाहुणा व्हावे लागेल.

- Advertisement -

मुंबई पोलिसांच्या सेन्स ऑफ ह्युमरचे कौतुक

सोशल मीडियावरही अनेक यूजर्सनी या प्रकरणावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने ‘इज्जत से ले जायेंगे’ असे लिहिले आहे, तर दुसऱ्या यूजरने म्हटले आहे की, हे मुंबई पोलिसांचे योग्य उत्तर आहे. एका यूजरने लिहिले, ‘खूप छान! किती विनोदाची भावना आहे! तुमचे ट्विट लिहिण्यासाठी तुम्ही एखाद्या विनोदी कलाकाराची नियुक्ती केली आहे का?’. या प्रकरणात, लोकांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी कारवाई करणे आवश्यक आहे.


हे ही वाचा – पाकव्याप्त काश्मीर २०२४ पर्यंत भारतात येऊ शकतो, केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे वक्तव्य


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -