घरमुंबई'प्लास्टिक द्या, मास्क फूकट घ्या' मध्य रेल्वेची भन्नाट आयडिया

‘प्लास्टिक द्या, मास्क फूकट घ्या’ मध्य रेल्वेची भन्नाट आयडिया

Subscribe

राज्य सरकारने प्लास्टिक बंदी लागू केली असली आजही अनेक ठिकाणी प्लॉस्टिकचा वापर सर्रापणे होतोयं.
यावर उपाय म्हणून आता रेल्वे प्रशासनाने एक भन्नाट मोहिम हाती घेतली आहे. १८ मार्च जागतिक पुनर्वापर दिनानिमित्त प्लास्टिक बंदीची जनजागृती आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यासाठी मध्य रेल्वेने “प्लास्टिक लाओ, मास्क पाओ” ही भन्नाट मोहिम सुरु केली आहे.

प्लास्टिकचा पुनर्वापर करत भविष्यात देशातील वाढते प्लास्टिक प्रदुषण तसेच कोरोना संकट टाळण्यासाठी मध्य रेल्वेने जागतिक पुनर्वापर दिनानिमित्त ‘प्लास्टिक द्या मास्क घ्या’ ही मोहिम हाती घेतली आहे. मुंबईच्या दादर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकांवर ही मोहिम सुरु होणार आहे. या स्थानकांवर प्लास्टिक कचरा जमा करण्यासाठी केंद्र तयार केले जाणार आहे. या केंद्राला भेट देत प्रवासांना आपल्या जवळील प्लास्टिक कचरा जसे की पेट बाटल्या, पॉलिथीन पिशव्या दिल्यानंतर मोफत मास्क मिळणार आहे.

- Advertisement -

संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम, भारत, बृहन्मुंबई महानगरपालिका (एमसीजीएम), हिंदुस्तान युनिलिव्हर (एचयूएल) आणि स्त्री मुक्ती संघटना (एसएमएस) यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहिम राबवली जात आहे. यंदा जागतिक पुनर्वापर दिवसाचा विषय ‘रीसायकलिंग हीरोज’ आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर टाळत शहर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, तसेच कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरणे महत्वाचे आहे. याबाबतची जनजागृती करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्या असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाने केला आहे.

 

- Advertisement -

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -