घरमुंबईडॉक्टरांच्या मदतीने अत्याचार करणार्‍या नराधमाला अटक

डॉक्टरांच्या मदतीने अत्याचार करणार्‍या नराधमाला अटक

Subscribe

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण

जसलोक हॉस्पिटलच्या डॉक्टरांच्या मदतीने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमाला अटक करण्यात आली आहे. सदरची कारवाई गावदेवी पोलिसांनी केली असून अटक करण्यात आलेला आरोपी हा मुलीचा नातेवाईक असल्याचे समोर आले आहे. सदरची घटना मुंबईतल्या ब्रीच कॅन्डी परिसरात घडली असून डॉक्टरांनी वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपीला २८ ऑक्टोबर २०१८ रोजी न्यायालयात हजर केले असता २ नोव्हेंबर २०१८ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

मूळचा पश्चिम बंगालचा असलेला उदय पाल (४७) आणि त्याचे कुटुंबीय एका उच्चभ्रू कुटुंबामध्ये घरकामाला होते. ब्रीच कॅन्डी येथील श्याम निवास इमारतीत राहणार्‍या वयोवृद्ध बहिणींच्या घरात उदय जेवण बनवण्याचे काम करत असे. त्याच इमारतीत घरकामासाठी महिन्याभरापूर्वीच पश्चिम बंगालमधून मेहुणीच्या १७ वर्षीय मुलीला तो घेऊन आला होता. मात्र नियत साफ नसलेल्या उदयने संधीचा फायदा घेत वारंवार पीडित मुलीचा विनयभंग केला. २७ ऑक्टोबर २०१८ रोजी उदय पाल ज्या महिलांच्या घरात काम करत होता त्या दोन्ही वयोवृद्ध बहिणी काही कामानिमित्त न्यूयॉर्कला गेल्या. घरातले काम झाल्यानंतर पीडित मुलगी घरात एकटीच आहे हे पाहून उदयने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकारामुळे पीडित मुलीची अचानक तब्येत बिघडली म्हणून आरोपी उदय पालने उपचारासाठी तिला जसलोक रुग्णालयात दाखल केले.

- Advertisement -

या अत्याचारामुळे पीडित मुलीचा रक्तस्त्राव होत होता पण मासिक पाळीमुळे तिला त्रास होत असल्याचे आरोपी उदय पालने डॉक्टरांना सांगितले. मात्र मुलीची अवस्था पाहून तिच्यावर अत्याचार झाल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले.त्यानुसार डॉक्टरांनी हा प्रकार गंभीर असल्याचे ओळखून तात्काळ गावदेवी पोलिसांना बोलावले. पोलिसांनी लागलीच मिळालेल्या माहितीनुसार आरोपी उदय पालच्या मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, महिला पोलिसांनी पीडित मुलीची चौकशी केली असता तिने सर्व घडलेल्या गोष्टी सांगितल्या. या प्रकरणी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ सह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -