घरमुंबईअवघ्या ३३ दिवसांत मस्जिद बंदर पादचारी पूल उभारला

अवघ्या ३३ दिवसांत मस्जिद बंदर पादचारी पूल उभारला

Subscribe

मस्जिद रेल्वे स्थानकावरील सीएसएमटीच्या दिशेकडील जुन्या अरुंद पादचारी पुलाच्या पुनर्बांधणीचे काम निर्धारित वेळेच्या १२ दिवस आधीच ३३ दिवसांतच पूर्ण करून मध्य रेल्वेने नवा इतिहास नोंदवला. मंगळवारी या पुलाचे शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. १७ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत मध्य रेल्वेचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी दिवस-रात्र काम सुरू ठेवले, ज्यामुळे हा पूल वेळेआधीच पूर्ण करून विक्रम नोंदवण्यात आला.

मस्जिद रेल्वे स्थानकातील पादचारी पुलावरील पादचार्‍यांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने हा पूल तोडून नवीन पादचारी पूल उभारण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. यापूर्वीच मध्य रेल्वेने कल्याण येथील पत्री पुलाला हटविल्यानंतर मस्जिद बंदर येथील सीएसएमटीच्या दिशेकडील जुना अरुंद पादचारी पूल हटविण्यासाठी आणि पादचारी पूल बांधण्याचे काम २६ नोव्हेंबर 2018 रोजी मध्य रेल्वेने हाती घेतले होते. या पादचारी पुलाच्या नुतनीकरणासोबतच डिसमेंटलिंग आणि त्याच जागी नवीन पादचारी पूल बांधण्याचे काम यात समावेश होते. या पादचारी पुलाचे पुनर्बांधणीचे काम 33 दिवसांच्या अवधीत पूर्ण झाले आहे. जे निर्धारित दिवसांच्या १२ दिवस आधी पूर्ण करून भारतीय रेल्वेत मध्य रेल्वेने एक नवीन विक्रम नोंदविला आहे.

- Advertisement -

या पादचारी पूलाची उंची 2.44 मीटरवरून 4.88 मीटरवर वाढविण्यात आली आहे. पायर्‍यांची रुंदी 2.44 मीटरवरून 3.66 मीटरपर्यंत वाढली आहे. तर दुसर्‍या बाजूने 1.80 मीटर ते 2.30 मीटरपर्यंत वाढली आहे. पादचारी पूल (फुट ओव्हर ब्रिज) 17 मीटर इतका लांब आहे. या पादचारी पुलाच्या कामासाठी १.२५ कोटी इतका खर्च आला आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून मध्य रेल्वेचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी यासाठी रात्रभर काम केले. पादचारी पुलावरील आरक्षण केंद्र या कालावधीत बंद ठेवण्यात आले होते. प्रवाशांच्या सोयीसाठी कल्याण दिशेकडील आरक्षण कार्यालयात अतिरिक्त तिकीट खिडक्या सुरू करण्यात आल्या होेत्या. प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून टीसी व आरपीएफ कर्मचार्‍यांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली होती. या पुलाशिवाय आणखी दोन पादचारी पूल सध्या स्थानक परिसरात आहेत. त्यामुळे प्रवाशांना फारसा त्रास झाला नाही. तसेच रेल्वेला सुद्धा वेळेत काम पूर्ण काम करणे शक्य झाले.

७२ दिवसांचा रिकॉर्ड मोडला
याआधी ७२ दिवसांत पादचारी पूल बांधण्याचा रेकॉर्ड भारतीय रेल्वेत होता. मात्र मध्य रेल्वेने हा विक्रम दीर्घकाळानंतर मोडला आहे. मस्जिद रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाची बांधणी ३३ दिवसांत पूर्ण करून मध्य रेल्वेने स्वत:चाच विक्रम मोडला आहे. यासाठी मध्य रेल्वेच्या अभियांत्रिकी विभाग आणि सर्व कर्मचारी अधिकारी यासाठी मोठे योगदान राहिले आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली आहे.

- Advertisement -

दिवस-रात्र केले काम
मध्य रेल्वेने १७ डिसेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत दिवस-रात्र या पुलाचे काम सुरु ठेवले. ज्यात पादचारी पुलाच्या पायर्‍या, छतावरील काँक्रीट टाकण्याचे काम, पेन्टींग, साइड रेलिंग लावणे, हात रेलिंग बसवणे, सोबतच फ्लोर फर्निशिंग अशी अनेक कामे मध्य रेल्वेच्या कर्मचारी आणि अधिकार्‍यांनी मोठ्या कसोशीने पूर्ण केली.

पुलाचे काम पूर्ण झाल्याचा कालावधी
२६ नोव्हेंबर रोजी पुलाचे काम सुरू, २ डिसेंबर रोजी जुन्या पुलाचे गर्डरला हटवले, ६ तासांच्या निर्धारित वेळेत हे काम पूर्ण झाले. जागेची अडचण असूनसुद्धा रेल्वे वाहतुकीत अडथळा न करता काम केले. रात्रकालीन कॉरिडॉर ब्लॉक घेऊन या पुलाच्या स्टेयरकेसच काम केले. १६ डिसेंबर रोजी ६ तासांचा ब्लॉक घेऊन गर्डर लॉन्च करण्यात आले. १७ ते २८ डिसेंबरपर्यंत सतत २४ तास काम करण्यात आले. २९ ते ३० विद्युत जोडणीचे काम पूर्ण केले.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -