बिना अंड्याचा केक-चॉकलेट विथ पार्ले जी बिस्कीट केक

Parle-g-Eggless cake

साहित्य :
*पार्ले जी बिस्किटे – 10 रु. चा पुडा
*कोको पावडर – 2 चमचे
*दूध 1- 1/2 कप
*पिठी साखर – 1/2 वाटी
*इनो (साधा) – 5 रु. चे पाकीट.

कृती :
*प्रथम मिक्सरच्या साहाय्याने बिस्किटांचा बारीक चुरा करून घ्यावा.
*त्या चुर्‍यामध्ये पिठी साखर आणि कोको पावडर घाला.
*नंतर दूध घालून भज्याच्या पिठाप्रमाणे सरबरीत भिजवा.
*अ‍ॅल्यूमिनियमच्या डब्याला सर्व बाजूने तूप लावून घ्या.
*गॅसवर लोखंडी तवा तापत ठेवा.
*वरील मिश्रण इनो घालून फेटून घ्या.
* मिश्रण फेटल्यानंतर ते डब्यामध्ये ओता.
*झाकण लावून डबा तव्यावर ठेवा. साधारण 30 मिनिटांनी झाकण उघडून केक तपासून पाहा.
*बिना अंड्याचा हा केक खूप छान लागतो.