घरCORONA UPDATEवोक्हार्ट, जसलोक, सैफी रुग्णालये अद्याप बंदच; कारवाईची मागणी

वोक्हार्ट, जसलोक, सैफी रुग्णालये अद्याप बंदच; कारवाईची मागणी

Subscribe

मुंबईतील वोक्हार्ट, जसलोक, सैफी, भाटीया आदी मोठी खासगी रुग्णालये अद्यापही का बंद असा सवाल करत ही सर्व रुग्णालये पुन्हा नॉन कोविड रुग्णांवरील उपचारासाठी खुली करावी.

मुंबईतील दवाखाने व नर्सिंग होम्स सुरु न केल्यामुळे कारवाईचे आदेश देताच महापालिका आयुक्तांनी मुंबईतील या सेवा सुरु झाल्याचा दावा प्रशासनाने केल्या. पण मुंबईतील वोक्हार्ट, जसलोक, सैफी, भाटीया आदी मोठी खासगी रुग्णालये अद्यापही का बंद असा सवाल करत ही सर्व रुग्णालये पुन्हा नॉन कोविड रुग्णांवरील उपचारासाठी खुली करावी. आणि जर ती सुरु केली जात नसतील तर त्यांच्याविरेाधात तात्काळ कारवाई केली जावी, अशी मागणी महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

मुंबईतील वोक्हार्ट, भाटीया, सैफी, जसलोक आदी खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने तेथील रुग्णसेवा बंद आहेत. कोरोनाचे रुग्ण आढळून आल्यास बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात यावे तसेच संपूर्ण इमारतीमध्ये सॅनिटायझेशन केले जावे. परंतु कोरोनाच्या नावाखाली अशी रुग्णालये आपत्तीच्या काळात बंद ठेवणे योग्य नाही. मात्र,ही सर्व रुग्णालये कोरोनाच्या नावाखाली जाणीवपूर्वक बंद ठेवली जात असल्याचा आरोप महापालिका विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.

- Advertisement -
जर आपण खासगी दवाखाने व नर्सिग होम्स यांना खुले करा असे सांगत आहोत, तेव्हा खासगी रुग्णालयांचीही तेवढीच जबाबदारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे दवाखाने व नर्सिंग होम्सविरोधात कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई केली जाणार आहे,त्याचप्रमाणे कोरोनाच्या नावाखाली बंद ठेवण्यात येणाऱ्या रुग्णालयांवरही कारवाई केली जावी,अशी मागणी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे निवेदन तसेच ट्विटरच्या माध्यमातून केली आहे.

महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीही वोक्हार्ट रुग्णालय त्वरीत सुरु होणे अपेक्षित असतानाही ते सुरु झाले नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हायलाच  हवी अशी मागणी केली. विशेष म्हणजे या वोक्हार्ट रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने योग्यप्रकारची दक्षता घेतली नाही. त्यामुळे या निष्काळजीपणाबद्दल या रुग्णालयावर कारवाई व्हायलाच हवी,असे म्हटले आहे. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे ई विभागात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -