घरमुंबईमोटारमनच्या सतर्कतेमुळे लोकलमधून पडलेली महिला बचावली

मोटारमनच्या सतर्कतेमुळे लोकलमधून पडलेली महिला बचावली

Subscribe

लोकलमध्ये असणाऱ्या डब्ब्यातील गर्दीमुळे हा प्रकार घडला असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले

वाढत्या लोकल ट्रेनच्या गर्दीमुळे ट्रेनमधून खाली पडणाऱ्या व्यक्तिच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच लोकल्सने प्रवास करणाऱ्या चाकारमान्यांचा आलेख हा वाढताना दिसत आहे. गुरूवारी सकाळी मध्य रेल्वेच्या मुंब्रा आणि कळवा स्थानकादरम्यान धावत्या लोकल ट्रेनमधून एक महिला खाली पडल्याची घटना घडली. मोटारमनच्या सतर्कतेमुळे या महिलेचे प्राण मोटारमनने वाचवले.

असा घडला प्रकार

गुरूवारी सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकलच्या महिला डब्यातून एक महिला मुंब्रा आणि कळवा स्थानकादरम्यान ही महिला खाली पडली. लोकलमध्ये असणाऱ्या डब्ब्यातील गर्दीमुळे हा प्रकार घडला असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ही महिला खाली पडल्यानंतर डब्ब्यातील काही महिला प्रवाशांनी त्वरित अत्यावश्यक सेवेकरिता साखळी खेचून मोटारमनला संकेत दिले. त्यावेळी, लोकलचा मोटरमन ए.ए.खान हे होते त्यांनी लोकल थांबवून रेल्वेचे सुरक्षारक्षक सुधीर मोरे यांच्याशी संपर्क साधून खान स्वत: लोकलमधून खाली उतरून जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेला उचलून कळवा स्थानकावर आणले.

- Advertisement -

जखमी महिलेचे नातेवाईक त्याच लोकलमधून प्रवास करत असल्याने त्यांना कळविण्यात आले. या जखमी महिलेवर प्रथमोपचार करण्यात आले. या घडलेल्या प्रकारानंतर मोटरमन ए.ए.खान यांच्या सतर्कतेमुळे आणि केलेल्या मदतीचे सर्वांनी कौतुक केले. दरम्यान, या घटनेमध्ये जखमीच्या नातेवाईकांनी कोणत्याही प्रकारची तक्रार रेल्वे पोलीसांकडे केली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -