घरमुंबईतरुणीवर बलात्कार करणारा गजाआड

तरुणीवर बलात्कार करणारा गजाआड

Subscribe

एका २९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी धरन शहा (२४) या तरुणाला लोकमान्य टिळक पोलिसांनी गुन्हा दाखल करत या तरुणाला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दक्षिण मुंबईतील मफतलाल बाथ अँड बोट क्लबमध्ये एका २९ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धरन शहा (२४) असे या तरुणाचे नाव असून त्याच्यावर लोकमान्य टिळक पोलिसांनी गुन्हा दाखल करत त्याला ताब्यात घेतले आहे. धरन याला लोकमान्य टिळक पोलिसांनी गजाआड केले असून त्याला न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नेमके काय घडले?

धरन आणि पीडित तरुणी यांची बऱ्याच दिवसांपासून मैत्री होती. अनेक दिवसांपासून दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. एकमेकांच्या संपर्कात असताना या तरुणाकडे पीडित तरुणीचे फोटो होते. हे जुने फोटो दाखवून हा तरुणीला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप या तरुणीने धरन याच्यावर केला आहे. एक दिवस या तरुणाने पीडितीला जुने फोटो दाखवून ब्लॅकमेल करत तिला दक्षिण मुंबईतील मफतलाल बाथ अँड बोट क्लबमध्ये बोलावून बलात्कार केल्याचा आरोप या तरुणीवर केला आहे.

- Advertisement -

मुलाने वडीलांच्या पदाचा दुरुपयोग केला

धरन या तरुणाचे वडील प्रसिद्ध व्यापारी असून ते मफतलाल बाथ अँड बोट क्लबचे सचिव आहे. त्यांच्या याच पदाचा दुरुपयोग केला असल्याचा आरोप या पीडितने केला आहे. याप्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस अधिक तपास करीत आहेत.

धरनला फसवण्याचा डाव

या तरुणीचा धरनला फसवण्याचा डाव आहे. ही तरुणी आमच्या मुलाला फसवत असल्याचा आरोप धरनच्या कुटुंबीयांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -