घरमुंबईचारकोप येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस

चारकोप येथील हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उघडकीस

Subscribe

स्वतःची अल्पवयीन मुलगी आणि भाचीची १ लाखाला विक्री करणाऱ्या महिलेला अटक, कुमारिका मुलींकडून करवून घेत होती देहविक्री

स्वतःची मुलगी आणि भाचीकडून देहविक्री करवणाऱ्या महिलेला चारकोप पोलिसांनी नुकतेच अटक केली आहे. मुली कुमारिका असल्याची बतावणी करुन ही महिला गिऱ्हाईकांकडून एका रात्रीचे १ लाख रुपये वसूल करत होती. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. चारकोप परिसरातील सेक्टर ८ परिसरात घरातूनच सेक्स रॅकेट चालवत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी धाड टाकून ३६ वर्षीय महिलेला अटक केली. पीटा कायद्याअंतर्गत पोलिसांनी या महिलेला अटक केले असून अटकेनंतर तीला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. रॅकेटमध्ये अन्य लोकांचाही समावेश असून पोलिसांनी त्यांचा शोध सुरु केला आहे.

एका रात्रीसाठी केली १ लाखाची मागणी
अटक महिलेने सहा महिन्यांपूर्वी सेक्टर ८ येथे घर भाड्याने घेतले होते. सुरुवातीला आरोपी महिला तीच्या मुलीसह राहत होती. काही दिवासांनी या महिलेने राजस्थानवरुन तीच्या भाचीलाही आपल्या घरी राहण्यास बोलावले. भाचीचे आई वडिल राजस्थान येथे राहत असून त्यांनी आपल्या मुलीला शहरात कामकरण्यासाठी पाठवले. मागील काही महिन्यांपासून ही महिला आपल्या घरी देहविक्री व्यवसाय करत होती. परिसरातील लोकांना संक्षय येऊनये म्हणून ती महिन्याला एक ते दोन गिऱ्हाईकांनाच आपल्या घरी बोलावत होती. चारकोप पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून या महिलेला रंगेहाथ अटक केली. सध्या महिलेच्या तावडीतून या दोघींची सुटका केली असून त्यांना बाल सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -

मागील काही महिन्यांपासून सेक्टर ८ येथे हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. कुमारिका मुलींशी संभोग करणारे गिऱ्हाईकांबरोबरच ही महिला व्यवहार करत होती. मुली बरोबरच भाचीलाही तीने या कामाला लावले. एका रात्रीसाठी ही महिला गिऱ्हाईकांकडून १ लाख रुपये घेत होती. लोकांना संक्षय येऊ नये म्हणून अनेकदा ती मुलींना गिऱ्हाईकांबरोबर बाहेर पाठवत होती. पोलिसांनी माहिती मिळाल्यावर पोलीसांनी गिऱ्हाईक बनून या महिलेला गाठले व व्यवहार करताना या महिलेला रंगेहात अटक केले. महिलेवर कलम ३४० आणि पीटा कायद्याअंतर्गत कारवाई केली गेली असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -