घरताज्या घडामोडीशिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा

शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा

Subscribe

गावित यांनी महिलेने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत.

पालघरचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांच्यावर नयानगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तक्रारदार महिला खासदार गावितांच्या गॅस एजन्सीमध्ये काम करत होती. गावित यांनी महिलेने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. हे संपूर्ण प्रकरण खोटे आहे. माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे, असे त्यांनी सांगितले. तक्रारदार महिला गेल्या १५ वर्षांपासून खासदार गावितांच्या गॅस एजन्सीमध्ये काम करत आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून माझा लैंगिक छळ, अत्याचार, शोषण केले जात आहे. सन २००५ मध्ये गावित अचानक घरी आले आणि भेटवस्तू म्हणून मोबाईल आणला आहे, असे सांगितले. त्यावेळी मी तो घेण्यास नकार दिला. त्यानंतर माझ्याशी मैत्री कर, तुला घर, पैसा सर्व देतो, मला शारीरिक सुख दे, असे म्हटल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय अनेकदा आपला विनयभंग केल्याचे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. या अगोदर मी कोकण भवन पोलीस महानिरीक्षकांपासून सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटले. मात्र, राजकीय दबाव असल्याने माझी तक्रार नोंदवली गेली नाही. आज माझी तक्रार दाखल केली. गावित मोठे नेते आहेत, माझ्या जीवाला धोका आहे. त्यामुळे मला भीती वाटत आहे, पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी, असे तक्रारदार महिलेने म्हटले आहे.

- Advertisement -

गावित यांनी महिलेने केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तक्रारीत काहीही अर्थ नाही. माझ्या विरोधात गुन्हा दाखल झालेला नाही. त्यांनी फक्त लेखी पत्र दिले आहे. माझ्या गॅस एजन्सीमध्ये ही महिला गॅसचा काळाबाजार करायची. माझ्या कंपनीत १ कोटीपेक्षा अधिक पैशांची त्यांनी अफरातफर केली आहे. याबाबत मी स्वतः त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. सहा दिवस त्यांनी तरुंगवासही भोगला आहे. सदरचा आरोप खोटा आहे, असे गावित यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -