घरट्रेंडिंगVideo : मुंबईत ट्रॅफिक पोलिसाला महिलेच्या अर्वाच्च्य शिव्या; व्हिडिओ व्हायरल!

Video : मुंबईत ट्रॅफिक पोलिसाला महिलेच्या अर्वाच्च्य शिव्या; व्हिडिओ व्हायरल!

Subscribe

कोरोना काळात ज्या पोलिसांना कोरोना योद्धे म्हणून मानाचा मुजरा केला, त्याच पोलिसांना भर चौकात तोंडात मारत आणि अश्लाघ्य आणि अर्वाच्य भाषेत शिव्या देत एका महिलेने अपमानित केल्याचा प्रकार मुंबईत घडला आहे. मुंबईच्या काळबादेवी परिसरात ही घटना घडली असून या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या महिलेला आणि तिच्या एका साथीदाराला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसाने आपल्याला शिव्या घातल्याचा दावा या महिलेने केला आहे. मात्र, ही महिलाच पोलिसाला शिव्या आणि मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओनंतर अनेक राजकीय नेत्यांनी देखील अशा प्रकारे पोलिसांना मारहाण झाल्याची निंदा केली आहे.

व्हिडिओमध्ये महिला संबंधित पोलीस अधिकाऱ्याची कॉलर पकडून त्याला थोबाडीत मारत असल्याचं दिसत आहे. शिवाय, मारताना त्याला अर्वाच्च्य शिव्या देखील देत असल्याचं दिसत आहे. मात्र, तरीदेखील पोलीस महिलेला विरोध करताना किंवा तिचा हात अडवताना दिसत नाहीये. दरम्यान, बऱ्याच वेळानंतर एक महिला पोलीस येऊन या महिलेला दूर सारत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे. मात्र, या महिला पोलिसाशी देखील सदर महिला अरेरावीच्या भाषेत बोलत आहे.

- Advertisement -

का देत होती महिला शिव्या?

सदर महिला ही तिच्या सहकाऱ्यासोबत बाईकवरून जात असताना ट्रॅफिक पोलिसानं त्यांना अडवलं. तिच्या सहकाऱ्याने हेलमेट न घातल्यामुळे ट्रॅफिक पोलिसानं त्यांना रोखून दंडाची मागणी केली. यावर ते दोघेही भडकले. वाद इतका विकोपाला गेला की महिलेनं थेट शिव्या द्यायला सुरुवात केली. संबंधित पोलीस हवालदारानं मला शिव्या दिल्याचा दावा या महिलेनं केला आहे.

पाहा घटनेचा व्हिडिओ!

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -