घरताज्या घडामोडीमहिला जवानाच्या प्रसंगावधाने प्रवाशाचा वाचला जीव; थरारक प्रकार सीसीटिव्हीत कैद

महिला जवानाच्या प्रसंगावधाने प्रवाशाचा वाचला जीव; थरारक प्रकार सीसीटिव्हीत कैद

Subscribe

कर्तव्यावर असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या महिला जवान लता बनसोडे यांनी प्रसंगावधान दाखवून एका प्रवाशाचा जीव वाचवला आहे.

पश्चिम रेल्वेच्या ग्रँट रोड रेल्वे स्थानकात एका प्रवाशाला चक्कर आल्यामुळे तो प्रवासी रेल्वेच्या रुळावर अचानक कोसळला आणि त्याच दरम्यान समोरुन लोकल येत होती. मात्र, नशिब बलवत्तर असल्याने हा प्रवासी वाचल्याचे समोर आले आहे. कर्तव्यावर असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या महिला जवान लता बनसोडेने प्रसंगावधान दाखवून त्या प्रवाशाचा जीव वाचवला आहे. ही घटना रेल्वे स्थानकांवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?

शनिवारी २६, डिसेंबर रोजी संध्याकाळी ग्रँट रोड रेल्वे स्थानकावरील क्रमांक १ वर इरानी कैजाद नावाचे प्रवासी लोकलची वाट पाहत होते. त्यादरम्यान त्यांना अचानक चक्कर आली. तोल सांभाळत असताना ते थेट रेल्वेच्या रुळावर कोसळले. स्थानकावर जास्त वर्दळ नव्हती. त्यामुळे हा प्रकार कुणाच्या लक्षात आला नाही. पण, तिथेच तैनात असलेल्या महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या महिला जवान लता बनसोडे आणि रेल्वे सुरक्षा जवान कैलाश चंद्र यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ईरानी कैजाद यांच्याकडे धाव घेतली. त्यांच्यापासून काही अंतरावर दूर असलेल्या व्यक्तीला महिला जवानाने आवाज दिला. त्यानंतर त्यानेही मदतीसाठी धाव घेतली. तेवढ्यात समोरून लोकल आली होती. पण, मोटरमनने प्रसंगाचे गांभीर्य बघत लोकल जागेवरच थांबवली. त्यानंतर इरानी यांना रुळावरून प्लॅटफार्मवर सुखरुप आणण्यात आले. त्यानंतर इरानी यांच्यावर प्लॅटफार्मवरच प्राथमिक उपचार करण्यात आले आणि पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

सर्वस्तरातून कौतुक

ग्रँट रोड रेल्वे स्थानकांत घडलेली ही घटना संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लता बनसोडे आणि कैलास चंद यांनी प्रसंगावधान दाखवल्यामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला. त्यांच्या या धाडसाबद्दल सर्वस्तरातून कौतुक होत आहे. तसेच रेल्वेकडून त्यांच्या या कार्यासाठी गौरव सुद्धा करण्यात येणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – नववर्षाच्या पूर्वसंध्येला मुंबईच्या रस्त्यावर ३५ हजार पोलीस तैनात


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -