घरमुंबईतेरा नंबर पाना देना...बाईक ओके!! विक्रोळीत महिला मोटर मॅकेनिकची जादू

तेरा नंबर पाना देना…बाईक ओके!! विक्रोळीत महिला मोटर मॅकेनिकची जादू

Subscribe

एक महिला मोटरसायकल दुरुस्त करत असल्याचे पाहून तेथे आलेला अवाक् होतो. या ठिकाणी मोटरसायकल दुरुस्ती क्षेत्रात महिला सहसा नाहीत, हा समजच जयश्री बागवे यांनी मोटारसायकल मॅकेनिक बनत खोटा ठरवला आहे.

तेरा नंबरचा पाना दे…बाईक ओके झाली…
हा महिलेचा आवाज विक्रोळीमधील चेतक बाईक केअरमध्ये गेल्यावर ऐकू येतो आणि अ‍ॅप्रन घालून एक महिला मोटरसायकल दुरुस्त करत असल्याचे पाहून तेथे आलेला अवाक् होतो. या ठिकाणी मोटरसायकल दुरुस्ती क्षेत्रात महिला सहसा नाहीत, हा समजच जयश्री बागवे यांनी मोटारसायकल मॅकेनिक बनत खोटा ठरवला आहे.
चेतक बाईक केअर गॅरेजमध्ये त्या रिसेप्शनिस्ट म्हणून लागल्या. एसएनडीटीतून समाजशास्त्र या विषयात पदवीही त्यांनी घेतली आहे. उच्च शिक्षण घेऊनही त्यांनी हे क्षेत्र निवडले आहे. मोटर मॅकेनिक क्षेत्रात करिअर आहे, हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांनी कोहिनूर टेक्निकल शिक्षण संस्थेमध्ये मोटर मेकॅनिकसाठी प्रवेश घेतला.

टेक्निकल कोर्स जो करतो तो उपाशी मरत नाही, हे त्यांनी दाखवून दिले आहे. शिक्षण घेेेताना 10 अशी पटसंख्या होती. त्यात मी एकटी मुलगी होती. माझी जिद्द पाहून तेथील सरांनी मला खूप मदत केली आणि मी हळूहळू या क्षेत्रात आली, असे जयश्री यांनी सांगितले. भविष्यात मला मराठी मुली आणि मुलांसाठी मोटर मॅकेनिकचे क्लासेस उघडायचे आहेत. मराठी मुलं गॅरेज व्यवसायात कमी प्रमाणात आहेत. मराठी मुलांची नवीन फळी तयार करायची आहे. गॅरेज क्षेत्रात एकाच छताखाली दुरुस्ती आणि वाहन धुण्याची व्यवस्था असणारे सेंटर उघडण्याचाही त्यांचा मानस आहे. कोणतेही काम कमी समजू नये, असे त्या सांगतात.या क्षेत्रात आल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली . पण त्यांना न जुमानता मी माझे काम सुरु ठेवले. हे क्षेत्र वाईट नाही; पण महिलांनी इथे आपले नशीब आजमवले नाही. संधी मिळाली तर महिला कोणत्याही क्षेत्रात क्रांती घडवू शकतात. अजून मला खूप शिकायचे आहे, असेही जयश्री यांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

मोटरसायकल हातात पडली की ती दुरुस्त होतेच, अशी विश्वासार्हता त्यांनी निर्माण केली आहे. दररोज 6 मोटरसायकली त्या दुरुस्त करतात. जिद्दीच्या जोरावर त्यांनी इथपर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. सुरुवातीचा काळ खूप खडतर होता. गॅरेजमध्ये काम करताना खच्चीकरण झाले; पण डगमगले नाही, असेही त्या म्हणाल्या.

दुरुस्तीसह बाईकची स्वच्छताही

त्यांच्या गॅरेजमध्ये गाडी धुण्याची व्यवस्था असल्यामुळे सर्व्हिसिंगला आलेल्या दुचाकी दुरुस्ती झाल्यावर त्या स्वत: वॉश करतात. डिझेल वॉश, शॅम्पू वॉश ग्राहकाच्या इच्छेनुसार त्या दुचाकी धुवून देतात.

- Advertisement -

महिलांनी सर्व क्षेत्रात उतरले पाहिजे. जयश्रीला बघून इतर महिलांना प्रेरणा मिळते. या क्षेत्रात नफाही खूप आहे. जयश्रीला पाहून महिलांची संख्या वाढेल. – जया अहिरे, टू व्हिलर चालक

गॅरेजमध्ये जयश्रीला पाहून गर्व वाटतो. गॅरेजमध्ये पहिले पुरुष मॅकेनिकच दिसायचे, आता महिलाही दिसू लागल्या आहेत. महिला यांत्रिकी शिक्षण घेत आहेत ही खूप चांगली बाब आहे. – मंगेश गायकवाड,

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -