Sunday, February 21, 2021
27 C
Mumbai
घर मुंबई लग्नास नकार दिल्याने मुलीसह आईची हत्या

लग्नास नकार दिल्याने मुलीसह आईची हत्या

पनवेलमधील खळबळजनक घटना

Related Story

- Advertisement -

पनवेल तालुक्यातील दापोली पारगाव येथे आई व मुलीची धारदार चाकूने वार करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नास नकार दिल्याने आरोपीने रागाच्या भरात आज, शनिवारी सकाळी हे कृत्य केले असून घटनेत मुलीचे वडीलसुद्धा जखमी झाले आहेत. पनवेल तालुक्यातील दापोली येथील अरूण डाऊर यांच्या चाळीत बळखंडे कुटुंबिय राहते. त्यांच्याच बाजूला आरोपी राहतो. तो त्याच भागात डंपर चालक म्हणून कामाला होता. हे सर्व मराठवाडा विभागातील असून ते एकमेकांना पूर्वीपासून ओळखत होते. या आरोपीच्या पहिल्या पत्नीचे निधन झाले असल्याने त्याने दुसरे लग्न करण्यासाठी सुजाता (१८) हिला मागणी घातली होती. परंतु तिच्या घरच्यांनी वारंवार नकार दिला होता. आज सकाळीसुद्धा आरोपीने त्यांच्या घरी जाऊन पुन्हा लग्नाची मागणी घातली. यावेळी मुलीची आई सुरेखा (३७) व वडील सिद्धार्थ (४१) यांनी नकार दिल्याने रागाच्या भरात त्याने त्याच्याजवळ असलेल्या धारदार शस्त्राने त्यांच्यावर सपासप वार केले व तेथून पळ काढला.

या घटनेत आई सुरेखा व मुलगी सुजाता या गंभीररित्या जखमी होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर वडिलांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ-२ चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन भोसले पाटील, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे व त्यांचे पथक, गुन्हे प्रकटीकरण शाखेची पथके घटनास्थळी रवाना झाली. परिसरातील नागरिकांकडून माहिती घेऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पथके रवाना झाली आहेत. या घटनास्थळी डॉगस्कॉड, फिंगर प्रिंट्स आदींना पाचारण करण्यात आले. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

- Advertisement -