घरमुंबईमहिलांनी कुटुंब प्रमुख म्हणून अधिक सक्षम रहावे

महिलांनी कुटुंब प्रमुख म्हणून अधिक सक्षम रहावे

Subscribe

राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांचे प्रतिपादन,एसएनडीटीविद्यापीठाचा वार्षिक दिक्षांत समारंभ संपन्न

महिलांमध्ये असणारा आत्मविश्वास, धाडसहे तिला नेहमीच पाठबळ देत असते. महिला ही सहनशक्तीचा मोठा खजिना आहे. महिलांनी स्वत:च्या सक्षमीकरणाबरोबरच कुटुंबव्यवस्थेच्या प्रमुख भुमिकेतून अधिक सक्षम असले पाहिजे. सामाजिक,धार्मिक, आर्थिक, शैक्षणिक या सर्व क्षेत्रात सुवर्णपदक मिळवले तरी कुटुंबात प्रमुख भूमिकेतून सुवर्णपदाकापेक्षा मोठी जबाबदारी महिलांनी स्वीकारुन सुवर्णपदक मिळविले पाहिजे, असे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी शनिवारी येथे सांगितले.

चर्चगेट येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाचा 69वा वार्षिक दिक्षांत समारंभ राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी एसएनडीटी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. शशिकला वंजारी, संबंधितप्राध्यापक उपस्थित होते. दरम्यान राष्ट्रसेविका समितीच्या प्रमिला मेढे, सुप्रसिद्ध लेखिका व कवी अरुण ढेरे यांना डॉक्टर ऑफ लेटर्स (हॉनोरिस कार्स) पदवी प्रदानकरण्यात आली.

- Advertisement -

राज्यपाल म्हणाले, समाजव्यवस्थेमध्ये भविष्याचा विचारकरुन वर्तमानामध्ये वावरले पाहिजे. त्याचबरोबर आपला इतिहास आपण विसरु नये. आजची तरुण पिढी मोबाईलचा अतीवापर करत असल्याने त्यांचे पर्यटन, शिक्षण मोबाईलवरच सुरु असते. त्यामुळे मुलांचे फिरणे, अभ्यास करणे, गडकिल्ले यांचीपाहणी करणे हे कमी झालेले आहे.
मोबाईलचा योग्य वापर करावा. पण जास्तीचा वेळ आपलामोबाईलवर वाया घालवू नये. महिलांनी उच्च ध्येय ठेवून आपली वाटचाल करावी, असेहीराज्यपालांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -