…यामुळे मंत्रालयात महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

mantralay

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाशी संबंधित प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी सोमवारी मंत्रालयात एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रूपा मोरे असे या महिलेचे नाव असून ती आज तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याच्या बेतात असताना पोलिसांनी तिला अडविले. त्यामुळे पुढचा अनावस्था प्रसंग टळला.

आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास रूपा मोरे या मध्यमवयीन महिलेने मंत्रालयाच्या मुख्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारण्याचा प्रयत्न केला. तिच्या सोबत तिचे दोन मुलं होती. सायन येथील त्यांच्या एसआरए इमारतीतील घराबाबतच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे समजते. मात्र खाली उडी मारण्याच्या तयारीत असलेल्या रूपा मोरे यांना बंदोबस्तावरील पोलिसांनी रोखले. मोरे यांना नंतर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले.


हेही वाचा – मुंबई महानगरातील पायाभूत सुविधांना मिळणार चालना, MMRDA च्या अर्थसंकल्पास मंजूरी