लालबागमध्ये एका महिलेला कोरोनाची लागण

लालबागमध्ये एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे.

one corona patient found chandrapur
चंद्रपुरातही कोरोनाचा शिरकाव; तर राज्यात ३ हजार रुग्ण

मुंबईच्या लालबागमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. लालबागमध्ये राहणाऱ्या एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. ही महिला एका खासगी रुग्णालयातील कर्मचारी असल्याची माहिती समोर आली असून ही महिला राहत असलेली लालबाग परिसरातील इमारत आता सील करण्यात आली आहे.

धारावीत कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू

जगात थैमान घालणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना दिसत आहे. कारण जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतील शाहू नगरमध्ये राहणाऱ्या ५६ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा आज संध्याकाळी सायन रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या रुग्णाला २३ मार्चपासून सतत सर्दी, कफ आणि ताप येत होता. त्यामुळे २६ मार्च रोजी या रुग्णाला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, या रुग्णाचा आज कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सध्या कोरोनाचा आकडा राज्यात ३३५ वर पोहोचला आहे. तर मुंबईत आज ३० नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईचा आकडा १८१ वर गेला आहे. यामुळे प्रशासनाकडून वारंवार खबरदारी घेतली जात आहे.


हेही वाचा – धक्कादायक! धारावीत आढळून आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू