घरमुंबईसरकारी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी पुकारणार काम बंद आंदोलन

सरकारी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी पुकारणार काम बंद आंदोलन

Subscribe

सरकारी रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी विविध मागण्यांसाठी येत्या १५ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन पुकारणार आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून राज्य सरकारच्या रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी पदे भरावीत अशी मागणी करण्यात आली होती. मात्र या मागणीसाठी पाठपुरावा करुन देखील सरकार याकडे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत असल्याने सरकारी रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी येत्या १५ ऑक्टोबर या दिवशी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचा परिणाम रुग्णसेवेवर होण्याची शक्यता आहे. काही वर्षांपासून राज्य सरकारच्या जे.जे, कामा, जी.टी, सेंट जॉर्ज या रुग्णालयातील अनेक चतुर्थ श्रेणी पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे भरण्याच्या प्रमुख मागणीकरीता या चारही सरकारी रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी १५ ऑक्टोबरपासून काम बंद आंदोलन पुकारणार आहेत.

या आंदोलनात यांचा सहभाग

या आंदोलनात वॉर्डबॉय-आयांपासून ऑपरेशन थिएटरमधील सहाय्यक सहभागी होणार आहेत. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांना १६ तास काम करावे लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आला असल्याचं महाराष्ट्र राज्य चतुर्थश्रेणी सरकारी कर्मचारी संघटनेचे मुंबई अध्यक्ष गजानन म्हामुणकर यांनी सांगितले आहे. गुरुवारी या संघटनेची बैठक झाली त्यात हा निर्णय घेण्यात आला असल्याचं राज्य शासकीय कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस चंद्रकांत पाटणे यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

रुग्णालयातील रिक्त पदे भरावी यासाठी आम्ही गेले अनेक वर्ष लढा देत आहोत. पण, सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर दिवशी ओपीडीत जवळपास ४ हजार रुग्ण येतात. त्याचा सर्व भार आमच्यावर येतो. स्वयंपाक गृहातील जे लोक काम करतात ते ही सकाळपासून रात्रीपर्यंत काम करतात. सफाई कर्मचारी सकाळी ७ ला येतात, ते रात्रीपर्यंत काम करतात. सर्व गुलामगिरी सुरू आहे. शिवाय, सफाई कामगारांना ओटीमध्येही काम करावं लागतं. आतापर्यंत आम्ही गप्प बसलो होतो. पण, आता आंदोलन छेडणार आहोत. त्यासोबतच एका विभागातील निवृत्ती झालेले कर्मचारी दुसऱ्या ठिकाणी कामाला लावतात. आम्ही जेव्हा जेव्हा बंद पुकारला तेव्हा तेव्हा राजीव गांधी योजनेत काम करणारी माणसे इथे काम करतात. त्यामुळे ते लोक सांगतात की, बंदचा कुठलाही परिणाम रुग्णांवर झालेला नाही. आम्हाला ठराविक ड्यूटी देत नाही. या सर्व कारणांमुळे आम्ही बंद पुकारला आहे.  – चंद्रकात पाटणे, सरचिटणीस, राज्य शासकीय कर्मचारी संघटना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -