घरमुंबईराज्यभरातील परिचारिकांच काम बंद आंदोलन

राज्यभरातील परिचारिकांच काम बंद आंदोलन

Subscribe

विविध ठिकाणी काम करणाऱ्या परिचारिका संवर्गातील कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत.

राज्यात डॉक्टरांची संख्या ५० टक्के असून ती अपुरी पडत असल्याने रुग्णसेवेचे काम परिचारिकांकडून करुन घेतले जाते. त्यामुळे त्यांच्यावरचा ताण वाढतो. त्याबदल्यात परिचारिकांना तेवढे वेतन दिले जावे, अशी त्यांची सतत मागणी असते. मात्र, सातव्या वेतन आयोगातील त्रुटींमुळे अद्यापही परिचारिका संवर्गातील कर्मचारी हक्का वाचून दूर आहेत. म्हणून आरोग्य सेवा, वैद्यकीय शिक्षण विभाग, नगरपालिका-महानगरपालिका अशा विविध ठिकाणी काम करणाऱ्या परिचारिका संवर्गातील कर्मचारी त्यांच्या मागण्यांसाठी आझाद मैदानात उतरणार असल्याची माहिती समिती महाराष्ट्र राज्य परिचर्या आणि आरोग्य सेवा कर्मचारी संघटना समन्वय समिती प्रसिद्धी प्रमुख अजय क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं आहे. यात नर्सेस फेडरेशनदेखील उतरणार असल्याचे सांगण्यात आले.

उद्या आझाद मैदानात आंदोलन

२६ फेब्रुवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. राज्यात सुमारे २ लाख १९ हजार परिचारिका संवर्गातील महिला आरोग्य सेवा देत आहेत. परिचारिका वर्ग आरोग्य विभागाचा कणा असून त्यात बऱ्याच प्रमाणात महिला कर्मचारी आहेत. डॉक्टरांची अपुरी संख्या, वाढती लोकसंख्या तसेच खासगी दवाखान्यावरील लोकांचा उडत असलेला विश्वास, ३३ टक्के रिक्त पदे यामुळे रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकांच्या सतत नजरेसमोर राहणारी परिचारिकेला रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. परिचारिकांवर सतत अन्याय होत आला आहे. रुग्णसेवा, कामाचा वाढता ताण आणि परिवार या त्रिकोणात काम करणाऱ्या परिचारिकांचा सहनशिलतेचा अंत आता संपला असल्याचे सांगत आंदोलन छेडणार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisement -

या मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांची समितीने भेट घेतली. त्यांना समन्वय समितीने मागण्या वजा आंदोलन पत्र दिले आहे, असं ही सांगण्यात आले आहे.

या आहेत परिचारीकांच्या मागण्या

  • सातवा वेतन आयोग
  • स्वतंत्र संचलनालय उभारा
  • जुनी पेंशन योजना लागू करा
  • कंत्राटी भरती बंद करा
  • प्रशिक्षण संस्था प्राचार्य-उपप्राचार्य पदे निर्मित करा
  • सेवा अंतर्गत उच्चशिक्षणासाठी १ अध्ययन आणि १ प्रतिनियुक्ती रजा
  • आरोग्य बजेट वाढवा
  • समान काम समान दाम
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -