घरदेश-विदेशजागतिक कर्करोग दिन - भारतात दर वर्षी कर्करोगामुळे ७ लाख मृत्यू

जागतिक कर्करोग दिन – भारतात दर वर्षी कर्करोगामुळे ७ लाख मृत्यू

Subscribe

कर्करोगाला प्रतिबंध करता येऊ शकतो आणि कर्करोगाचे निदान लवकर झाले तर त्यावर उपचार करता येऊ शकतात असं जागतिक कर्करोग दिनानिमित्त कर्करोगतजज्ज्ञ सांगतात.

कर्करोग हे भारतातील मृत्यूंसाठी कारणीभूत असणारा एक प्रमुख घटक आहे. इंडियन काँन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर), इंडिया अगेन्स्ट कॅन्सर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कॅन्सर प्रिव्हेन्शन अँड रिसर्च या संस्थांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, दर वर्षी कर्करोगाचे ११ लाख ५७ हजार २९४ रुग्णांची नोंद केली जाते. जवळपास २२.५ लाख रुग्ण या आजारासह जगत आहेत. त्याचप्रमाणे, २०१८ साली कर्करोगामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या ७ लाख ८४ हजार ८२१ आहे. त्यामुळे, डॉक्टर तंबाखू सोडण्याचा, व्यायाम करण्याचा, सकस आहार घेण्याचा आणि कर्करोगाची नियमित चाचणी करून घेण्याचा, कुटुंबाची कर्करोगाची पार्श्वभूमी लक्षात घेण्याचा आणि वेळेवर लस घेण्याचा सल्ला देतात. असं केल्यास कर्करोगाला प्रतिबंध घालता येऊ शकतो.

दिवसेंदिवस फक्त भारतातच नाहीतर संपूर्ण देशात कर्करोग झालेल्या रुग्णांची आकडेवारी प्रचंड प्रमाणात वाढत आहे. पुरुषांमध्ये तोंडाचा, फुफ्फुसाचा, पोटाचा, आतड्याचा आणि अन्ननलिकेच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आढळून येते आणि महिलांमध्ये स्तनांचा, ओठांचा किंवा तोंडाचा , गर्भाशयाच्या, फुफ्फुसाच्या आणि जठराच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक आढळून येते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), इंडिया अगेन्स्ट आणि राष्ट्रीय कर्करोग प्रतिबंध व संशोधन संस्था यांनी २०१९ प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, ०.८१ टक्के पुरुषांना आणि ९.४२५ स्त्रियांना वयाची ७५ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच कर्करोग होण्याचा धोका आहे. त्याचप्रमाणे ७.३४ टक्के पुरुष आणि ६.२८ टक्के स्त्रिया या प्राणघातक आजारामुळे मृत्युमुखी पडू शकतात.

- Advertisement -

गर्भाशयाचा कर्करोग महिलांच्या जीवावर –

याशिवाय, गर्भाशयमुखाचा (सर्व्हायकल) कर्करोग भारतात दर ८ व्या मिनिटाला एका महिलेचा बळी घेत आहे, असे या अहवालातून दिसून येते. त्याचप्रमाणे भारतात नव्याने स्तनांच्या कर्करोगाचे निदान झालेल्या प्रत्येक २ स्त्रियांपैकी एक स्त्री प्राण गमावू शकते. धक्कादायक बाब म्हणजे, तंबाखू सेवनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दररोज ३,५०० एवढी आहे. २०१८ मध्ये तंबाखूशी निगडित कारणांमुळे मृत्यू झालेल्या स्त्री-पुरुषांची संख्या ३,१७,९२८ एवढी होती.

“ भारतात लाखो लोक फुप्फुसे, मुख, स्तन, जठर, गर्भाशयमुख, यकृत, प्रोस्टेट आणि रक्ताच्या कर्करोगाने ग्रासलेले आहेत. याशिवाय त्वचा, मूत्राशय आणि अन्ननलिकेच्या कर्करोगाचे रुग्णही आढळतात. कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण भारतात खूप आहे. आनुवंशिक बाबी, हार्मोन्सचा असमतोल, अनारोग्यकारक जीवनशैली, कमकुवत रोगप्रतिकार यंत्रणा, निदानास होणारा विलंब आणि वैद्यकीय सुविधांची कमतरता यामुळे कर्करोगाच्या विविध प्रकारांना आमंत्रण मिळू शकते. या ‘प्राणघातक आजारा’बद्दल जागरूकता नसल्यामुळे हे घडून येते. कर्करोगावरील उपचार, लक्षणे, निदान व प्रतिबंध यांबाबत सर्वांना शिक्षण देणे; नियमित चाचण्या व तपासण्यांची माहिती देणे, मुलांच्या अभ्यासक्रमांमध्ये कर्करोगाच्या घातक परिणामांची माहिती समाविष्ट करणे, शिबिरे, अभियाने आणि उपक्रमांचे आयोजन करणे तसेच कर्करोगाबद्दलचे गैरसमज नाहीसे करणे ही काळाची गरज आहे असं अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलचे ऑन्को सर्जन डाॅ. प्रशांत मुल्लेरपाटण यांनी सांगितलं.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -