घरमुंबईहिजाब प्रकरणी निकाल देणार्‍या न्यायाधीशांना वाय सुरक्षा

हिजाब प्रकरणी निकाल देणार्‍या न्यायाधीशांना वाय सुरक्षा

Subscribe

हिजाब प्रकरणी निकाल देणार्‍या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सरन्यायाधीश ऋतुराज अवस्थी यांना आथा वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. तर, धमकी देणार्‍या दोन आरोपींना तामिळनाडू पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. तिरुनेलवेली येथे कोवई रहमतुल्लाला अटक करण्यात आली, तर 44 वर्षीय एस जमाल मोहम्मद उस्मानी याला तंजावरमध्ये ताब्यात घेण्यात आले.

हिजाब हा इस्लामचा अत्यावश्यक भाग नाही आणि हिजाबवर बंदी घालणे योग्य आहे. असे कर्नाटक उच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने आपल्या निकालात म्हटले होते. तंजावरमधील पोलिसांनी शुक्रवारी तामिळनाडू तौहीद जमात मुख्यालयाचे अध्यक्ष एस. जमाल मोहम्मद उस्मानी आणि तंजावर जिल्ह्याचे नेते राजिक मोहम्मद यांना कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अपशब्द वापरल्याप्रकरणी अटक केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -