घरमुंबईस्थायी समिती अध्यक्ष पदासाठी यशवंत जाधव यांना चौथ्यांदा संधी

स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी यशवंत जाधव यांना चौथ्यांदा संधी

Subscribe

सुधार समिती अध्यक्ष पदासाठी सदानंद परब यांना तिसऱ्यांदा संधी, बेस्ट समिती अध्यक्ष पदासाठी आशिष चेंबूरकरांना पाचव्यांदा संधी, शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी संध्या दोशी यांना दुसऱ्यांदा संधी

मुंबई महापालिकेच्या महत्वाच्या चार वैधानिक समिती अध्यक्ष पदासाठी ५ व ६ एप्रिल रोजी निवडणुका होणार आहेत. त्यासाठी आज शिवसेना, भाजप, काँग्रेस या पक्षांच्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार न देता शिवसेनेला थेट पाठींबा जाहीर केला आहे. तर समाजवादी पक्षानेही एकही उमेदवार दिलेला नाही.

सर्वात महत्वाच्या स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी सत्ताधारी शिवसेनेतर्फे विद्यमान अध्यक्ष यशवंत जाधव यांनी लागोपाठ चौथ्यांदा आपला अर्ज दाखल केला आहे. बेस्ट समिती अध्यक्ष पदासाठी आशिष चेंबूरकर यांना पाचव्यांदा संधी देण्यात आली आहे. तर सुधार समिती अध्यक्ष पदासाठी सदानंद परब यांना लागोपाठ तिसऱ्यांदा आणि शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी संध्या दोशी यांना लागोपाठ दुसऱ्यांदा संधी देण्यात आली आहे. यासर्व उमेदवारांनी आज आपले अर्ज दाखल केले.

- Advertisement -
Sandhya Doshi filed an application for the post of Education Committee Chairperson
शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी संध्या दोशी यांनी अर्ज भरला

शिवसेनेला एकतर्फी अथवा बिन विरोध निवडणूक जिंकू न देण्यासाठी भाजपने स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी राजेश्री शिरवाडकर यांना, सुधार समिती अध्यक्ष पदासाठी स्वप्ना म्हात्रे यांना, शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी पंकज यादव यांना तर बेस्ट समिती अध्यक्ष पदासाठी प्रकाश गंगाधरे यांना संधी दिली आहे.

Sadanand Parab filled the application for the post of Chairman of the Reforms Committee
सुधार समिती अध्यक्ष पदासाठी सदानंद परब यांनी अर्ज भरला

काँग्रेसतर्फे स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी आसिफ झकेरिया यांना, सुधार समिती अध्यक्ष पदासाठी आश्रफ आजमी यांना, शिक्षण समिती अध्यक्ष पदासाठी आशा कोपरकर यांना तर बेस्ट समिती अध्यक्ष पदासाठी रवी राजा यांना संधी देण्यात आली आहे.

Ashish Chemburkar filled the application for the post of Best Committee Chairman
बेस्ट समिती अध्यक्ष पदासाठी आशिष चेंबूरकर यांनी अर्ज भरल
Opposition leader Ravi Raja has filed his nomination papers for the post of Best Committee Chairman
बेस्ट समिती अध्यक्ष पदासाठी काँग्रेसतर्फे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला
BJP corporator Prakash Gangadhare filed his application for the post of Best Committee Chairman
बेस्ट समिती अध्यक्ष पदासाठी भाजप तर्फे नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी आपला अर्ज दाखल केला
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -