घरताज्या घडामोडीदोन दिवसांत तब्बल ५ लाख कोटींची गुंतवणूक; श्रीमंत 'योगी' यांचा मुंबई दौरा...

दोन दिवसांत तब्बल ५ लाख कोटींची गुंतवणूक; श्रीमंत ‘योगी’ यांचा मुंबई दौरा यशस्वी

Subscribe

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले होते. या मुंबई दौऱ्यात योगींनी उद्योजकांच्या गाठीभेटी घेतल्या. या भेटींदरम्यान 5 लाख कोटींच्या गुंतवणुकींची आश्वासने झोळीत घेऊन 'श्रीमंत योगी' युपीत परत गेले.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले होते. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक युपीमध्ये नेण्याचा मानस त्यांना आखला होता. त्या पाश्वभूमीवर योगींनी हा दौरा केला असून, त्यांचा हा दौरा यशस्वीही ठरला. कारण या दोन दिवसांच्या दौऱ्यात योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेशमध्ये ५ लाख कोटींची गुंतवणूक घेऊन गेले आहेत. याबाबत उत्तर प्रदेश सरकारने माहिती दिली आहे. (Yogi Adityanath Secures 5 Lakh Crore Up Investment Proposals In Mumbai Visit)

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले असून, या दौऱ्यावेळी गुरुवारी त्यांनी मुंबईतील बँकर्स, आघाडीचे उद्योगपती, अभिनेते आणि निर्मात्यांसोबत चर्चा केली. उत्तर प्रदेशात होणाऱ्या जागतिक गुंतवणूकदार परिषदेसाठी उद्योगपतींना निमंत्रण देण्यासाठी योगी मुंबईत आले होते. योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी मुंबईत मुकेश अंबानी यांच्यासह देशातील प्रमुख उद्योजकांची भेट घेतली. त्यानंतर उत्तर प्रदेश राज्य सरकारकडून सांगण्यात आले की, रिलायन्स समूहाने राज्यभरात 5G तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक करण्याचा आणि उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात उत्तम आरोग्य सेवांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे.

- Advertisement -

रिलायन्सप्रमाणेच अदानी समुहानेही उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे. अदानी समूहाने एनसीआरमध्ये सार्वजनिक-खाजगी भागीदारीत वैद्यकीय महाविद्यालय आणि नोएडामध्ये १०,००० तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, असं राज्य सरकारने म्हटले.

मुंबई दौऱ्यावर असताना योगी आदित्यनाथ यांनी भेट घेतलेल्या उद्योजकांमध्ये कोटक महिंद्राचे सीईओ उदय कोटक, एसबीआयचे अध्यक्ष दिनेश खारा, एसआयडीबीआयचे शिव सुब्रह्मण्यम रमण यांच्यासारख्या बँकर्सचा समावेश होता. त्यानंतर त्यांनी आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला, हिरानंदानी समूहाचे सहसंस्थापक डॉ. निरंजन हिरानंदानी, जेएसडब्ल्यू समूहाचे एमडी आणि अध्यक्ष सज्जन जिंदाल, पिरामल ग्रूपचे अध्यक्ष अजय पिरामल यांच्याशी चर्चा केली. अदानी समूहाचे करण अदानी, अंबानी समूहाचे मुकेश अंबानी यांचीदेखील त्यांनी भेट घेतली.

- Advertisement -

दरम्यान, एकिकडे आपल्या राज्यात उद्योजकांनी गुंतवणूक करवी यासाठी योगी आदित्यनाथ दौरे करत आहेत. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. त्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे सत्ताधाऱ्यांवर वारंवार हल्लाबोल करत आहेत.


हेही वाचा – म्हाडाकडून पुण्यात 5,990 घरांची सोडत जाहीर; ‘असा’ करा अर्ज

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -