घरमुंबईजिममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू

जिममध्ये व्यायाम करताना तरुणाचा मृत्यू

Subscribe

जिम करत असताना एका २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

प्रत्येक युवकाला आपली सुद्धा बॉडी व्हावी, चित्रपटातल्या हिरोसारखे रुबाबदार दिसावे, असं वाटते. मात्र त्याचा कधीकधी अतिरेक देखील होऊन जीव गमवावा लागतो. अशीच एक घटना ठाण्यात घडली आहे. ठाण्याच्या एका जिममध्ये व्यायाम करताना एका २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. प्रतिक परदेशी (२८) असं मृत युवकाचं नाव आहे. ठाण्यामधील दम्माणी इस्टेट येथील ‘गोल्ड जिम’मध्ये हा तरुण व्यायाम करत असताना अचानक कोसळला. त्याला जिममधील व्यक्तींनी रुग्णालयात तात्काळ दाखल केले आहे. या तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे.

हार्टस्ट्रोकमुळे आला मृत्यू

महगिरी येथे प्रतिक परदेशी हा तरुण राहायचा. या तरुणाला जिमची आवड असल्यामुळे तो रोज गोल्ड जिममध्ये येऊन व्यायाम करत होता. काही कारणास्तव तो आठ ते दहा दिवस जिममध्ये आला नव्हता. १७ जानेवारी रोजी तो खूप दिवसांनी जिममध्ये येऊन व्यायाम करत होता. नेहमीप्रमाणे जिम करत असताना हा तरुण अचानक खाली कोसळला. त्याला त्वरीत डॉक्टरांकडे नेले पण तो वाचू शकला नाही. या तरुणाला मृत्यू हार्टस्ट्रोकमुळे आल्याचं सांगण्यात आलं आहे.

- Advertisement -

चित्रपटातल्या हिरोसारखे रुबाबदार दिसावे त्याप्रमाणे ते एखाद्या जिममध्ये प्रवेश घेतात आणि सरावाला सुरुवात करतात. तसेच झट्पट बॉडी व्हावी म्हणून जिमच्या ट्रेनरकडून आयडिया देखील घेतल्या जातात. पण त्यात प्रत्येक तरुणाच्या खाण्यापिण्याची पद्धत वेगळी असते. त्यात फास्ट फूड आणि जंकफूडमुळे लठ्ठपणा वाढलेला असतो आणि प्रोटीन्सच्या अभावामुळे मग कृत्रिम प्रोटीन्सच्या मागे लागतात. या कृत्रिम प्रोटीन्सच्या प्रचंड सेवनाने शरीरावर विपरीत परिणाम होतात आणि मग अशा घटना वाढत जातात.


वाचा – क्रिकेट खेळताना हृदयविकाराने मृत्यू होण्याच्या घटनेत वाढ

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -