डोंबिवलीत ओळखीच्या तरूणानेच केली ‘ति’ची हत्या, अतिप्रसंग ठरला कारण!

डोंबिवलीत सोसायटीतल्याच तरुणाने १९ वर्षीय तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर तिची हत्या केली.

security guard rape on student at famous college of Delhi university

१९ वर्षीय विद्यार्थिनीची घरात घुसून हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री डोंबिवलीत घडली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दीपक भणगे या तरूणाला अटक केली आहे. ते दोघेही एकाच इमारतीत राहत असल्याने एकमेकांना ओळखत होते. सदर तरुणी घरात एकटी असल्याचे पाहून दीपकने तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न केला. मात्र पीडित तरुणीने प्रतिकार केला म्हणून त्याने तिची गळा आवळून हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

डोंबिवली पूर्वेतील सुनील नगर परिसरात १९ वर्षीय बीएससीचं शिक्षण घेणारी विद्यार्थिनी घरी एकटीच होती. तिची आई कामावर गेली होती. संध्याकाळी आई जेव्हा घरी आली, तेव्हा तिने आपल्या मुलीला अस्ताव्यस्त अवस्थेत पहिल्यानंतर तिला धक्का बसला. तिने आईच्या हाकेला कोणताही प्रतिसाद न दिल्याने आईने हंबरडा फोडला. शेजारचे रहिवाशी धावत आले. रामनगर पोलीस ठाण्यात माहिती दिल्यानंतर रामनगर पोलिसांनी त्वरीत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरु केला आहे. मात्र पोलिसांच्या तपासात धक्कादायक प्रकार समोर आला.

नक्की काय घडलं दुपारी?

दुपारच्या सुमारास या तरुणीच्या घराखालच्या रूममध्ये राहणारा दीपक भणगे हा तरुण तरुणीच्या घरी आला. तुमच्या घरात खारुताई घुसली आहे, असे सांगून तो घरात शिरला. दीपक ओळखीचा असल्याने तरुणीने त्याला घरात येऊ दिले. मात्र, दीपकच्या मनात दुसरेच काही होते. त्याने या तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने नकार देत प्रतिकार केला. दीपकची पोलखोल होईल म्हणून त्याने तरुणीची गळा आवळून हत्या केली आणि तिथून पळ काढला. मात्र, पोलिसांनी अवघ्या काही तासांतच तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून तिची हत्या करणाऱ्या दीपक भणगे याचा शोध घेऊन त्याला अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.


हेही वाचा – प्रियकर भेटायला आला नाही म्हणून प्रेयसीची व्हिडिओ कॉलिंगवर आत्महत्या!