घरताज्या घडामोडीहळदीत नाचता नाचता तरूणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

हळदीत नाचता नाचता तरूणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू

Subscribe

हळदीच्या कार्यक्रमात नाचता नाचता अचानक 25 वर्षीय तरूणाचा मृत्यू

हळदी समारंभात नाचताना तरूणाला हृदय विकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. मयत तरूणाचे नाव अरशद असलम शेख (२५) असून तो ओटी सेक्शन परिसरात राहणारा होता. अरशद हा हळदी समारंभात नाचत असताना त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला उपचारासाठी त्वरीत मध्यवर्ती रूग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

उल्हासनगर गुन्हेगारी बातम्या :-

विठ्ठलवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका ऑर्केस्ट्रा बारमधील नर्तीका अंगावर तोकडे कपडे परीधान करीत अश्लिल नृत्य करत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच रात्री साडे बाराच्या सुमारास गुन्हे शाखेतील पोलिसांनी ऑर्केस्ट्रा बारवर धाड टाकली. त्यावेळी पोलिसांनी अश्लिल हावभाव करणाऱ्या नर्तीकांना अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अ‍ॅपल लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारचे मॅनेजर प्रमोदकुमार गुप्तासह, २ वेटर आणि १० नर्तीकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

- Advertisement -

मध्यवर्ती रूग्णायात राबविण्यात आले आपत्ती व्यवस्थापनाचे शिबिर

उल्हासनगर महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत येथील मध्यवर्ती रूग्णालयात आपत्ती व्यवस्थापण प्रशिक्षण शिबीर राबवण्यात आले होते. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मार्गदर्शनाद्वारे महापालिकेला पत्र लिहून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानुसार उल्हासनगर महानगरपालिका यांच्या आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत आपत्ती व्यवस्थापन अधिकारी बाळूभाऊ नेटके आणि त्याचे सहकारी मार्फत हे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.

भरधाव डंम्परच्या धडकेने महिलेचा मृत्यू

भरधाव वेगाने धावणाऱ्या डंम्परने महिलेला धडक देऊन महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मध्यवर्ती पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. त्या महिलेचे नाव जया प्रकाश चांगलानी (४९) असून त्या दशरा मैदान रूचिका पॅलेस येथील रहिवासी होत्या. जया यांना रात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने जाणा-या डंम्परने धडक दिल्याने त्यांना तत्काळ क्रिटीकेअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिस ठाण्याात डंम्परचाललकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -