घरमुंबईखड्ड्याने घेतला तरुणाचा बळी

खड्ड्याने घेतला तरुणाचा बळी

Subscribe

कोरम मॉलजवळ खोदलेल्या खड्ड्यात झाला अपघात

ठाण्याच्या कोरम मॉलच्या जवळ नाल्याच्या कामासाठी पालिकेच्या ठेकेदाराने खोदलेल्या खड्ड्यात बाईकसह पडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. सोमवारी रात्री ही घटना घडली. यात आपल्या घरी बाईकने निघालेल्या ३५ वर्षीय प्रमोद देऊळकर या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेने ठाण्यात खळबळ उडाली. मृतक तरुणाच्या कुटुंबियांना ठेकेदाराने आर्थिक मदत करावी, अशी मागणी यू एन्ड मी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विष्णू तिवारी यांनी केली आहे. तर या घटनेप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात ठेकेदाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाण्याच्या कोरम मॉलजवळ नाल्याच्या कामासाठी खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्याच्या बाजूला संरक्षणासाठी बॅरिकेट्स लावण्यात आलेले नव्हते, अशी माहिती स्थानिकांनी दिली. सोमवारी मृतक प्रमोद देऊळकर (३५ रा. दिवा) हा ठाण्यात आपल्या मित्रांना भेटण्यासाठी आला होता. सोमवारी रात्री प्रमोद आपल्या होंडा शाईन या दुचाकीवरून दिव्याला निघाला असता सर्व्हिस रोडने वेगाने आला असता रस्त्यात खोदलेला खड्डा हा रात्री अंधारामुळे दिसला नाही. प्रमोद देऊळकर हा खड्ड्यात बाईकसह पडला. त्याला गंभीर इजा झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या खड्ड्यात बाईक आणि प्रमोद मृतावस्थेत आढळला. घटनास्थळी पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून ताब्यात घेतला. या प्रकरणी महानगरपालिकेच्या ठेकेदारावर वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.

- Advertisement -

सोमवारी रात्री अपघाताचा घडलेला प्रकार हा ठेकेदारांच्या निष्काळजी आणि बेजबाबदारपणामुळे घडला. एवढ्या मोठ्या खड्ड्याच्या ठिकाणी बेरिकेटसह सुरक्षा रक्षक तैनात करणे गरजेचे आहे. मंगळवारी प्रमोद देऊळकर यांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी ठेकेदार आणि पालिका आयुक्तांकडे लेखी स्वरूपात मागणी करणार असल्याची प्रतिक्रिया सामाजिक संस्था यू एन्ड मी फाऊंडेशनचे अध्यक्ष विष्णू शंकर तिवारी यांनी व्यक्त केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -